Mothers Day : समाजाने नाकारलेल्या अनाथांची आई, Video पाहून तुम्ही कराल कौतुक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मायेची ऊब आणि आईचं प्रेम हे सगळ्यांच्याच नशिबात असतं असं नाही. हेच मायेचे प्रेम आणि मायेची ऊब देण्याचे काम छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतीय समाजसेवा केंद्रातील आई करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण याची तुलना कशा सोबतच केली जाऊ शकत नाही. आपल्या आयुष्यातील अशी एकमेव व्यक्ती म्हणजे आई ती कुठलाही हेतू शिवाय आपल्या मुलांवरती प्रेम करते. प्रत्येक मुलांसाठी त्यांची आई त्यांचे सर्वस्व असते. पण मायेची ऊब आणि आईचं प्रेम हे सगळ्यांच्याच नशिबात असतं असं नाही. हेच मायेचे प्रेम आणि मायेची ऊब देण्याचे काम छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतीय समाजसेवा केंद्रातील आई करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतीय समाजसेवा केंद्रामध्ये अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो. या ठिकाणी शून्य ते सहा वर्षापर्यंतच्या मुलांचे पालनपोषण आणि सांभाळ केला जातो. या ठिकाणी त्या मुलांची काळजी घेणाऱ्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना आई म्हणून संबोधलं जातं. या केंद्रामध्ये मुलांचा सांभाळ करण्यासाठी आई काम करतात. कविता नरवाडे आणि सविता जाधव अशी या महिलांची नावे आहेत. या ठिकाणी मुलांचा सांभाळ अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे करतात. त्यांच्यावरती प्रेम करतात.
advertisement
Solapur : जुळून आले दिव्यांग आणि दृष्टीहिन जोडप्यांचे रेशीमबंध, सोलापुरात पार पडला अनोखा विवाह सोहळा
मी गेल्या 21 वर्षांपासून भारतीय समाजसेवा केंद्रामध्ये काम करत आहे. या ठिकाणी जेव्हा मी पहिल्यांदा आले तेव्हा मी बघितलं की अतिशय लहान लहान मुलं या ठिकाणी आहेत. ज्या दिवशी मी या ठिकाणी आले त्या दिवशी एक बाळ रडत होतं त्याला मी जेव्हा जवळ घेतलं तेव्हा ते लगेच शांत झालं. हे बघून मला खूप छान वाटलं.
advertisement
गेल्या 21 वर्षांपासून मी आत्तापर्यंत अनेक बाळांचा सांभाळ केलेला आहे. या ठिकाणाहून जे बाळ जातात जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांचे बालपण कुठे गेलं त्याची विचारपूस करत ते आमच्या केंद्रामध्ये येतात आणि इथे विचारपूस करतात की लहानपणी ज्या आईने माझा सांभाळ केला ती आई कुठे आहे. ती आई कशी आहे हे ते विचारतात तेव्हा मनाला खूप आनंदाने शांती भेटते. जेव्हा आम्ही त्या मुलांना भेटतो त्यांना भेटल्यानंतर खूप आनंद होतो आणि खूप छान देखील वाटतं, असं कविता नरवाडे यांनी बोलतानी सांगितलं.
advertisement
मी गेल्या 7 वर्षांपासून या ठिकाणी काम करत आहे. पहिल्यांदा जेव्हा मी या संस्थेमध्ये आले या ठिकाणी छोटे छोटे बाळ बघितले. तेव्हा त्यांना बघून मला असं वाटलं की आपण यांच्यासाठी काहीतरी करावं आणि मी त्या क्षणी निर्णय घेतला की आपण देखील या ठिकाणी काम करायचं. सुरुवातीला मला अवघड वाटायचं की आपले लहान मुलं घरी सोडून कसे यावे पण जेव्हा मी या ठिकाणी यायला लागले आणि या मुलांसोबत दिवस कसा जातो हे मला कळतच नाही. खूप छान वाटतं या ठिकाणी मला काम करून, असं सविता जाधव बोलतानी म्हणाल्या.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
May 11, 2025 11:27 AM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Mothers Day : समाजाने नाकारलेल्या अनाथांची आई, Video पाहून तुम्ही कराल कौतुक