उन्हाळी सुट्टीत सुरक्षित प्रवास! ST चा मोठा निर्णय, पर्यटनाच्या राजधानीतून जादा बस, वेळापत्रक

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar News: उन्हाळा सुट्टीत प्रवाशांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला असून पर्यटनाच्या राजधानीतून जादा बस सोडण्यात येणार आहेत.

उन्हाळी सुट्टीत सुरक्षित प्रवास! एसटीचा मोठा निर्णय, पर्यटनाच्या राजधानीतून जादा बस, वेळापत्रक
उन्हाळी सुट्टीत सुरक्षित प्रवास! एसटीचा मोठा निर्णय, पर्यटनाच्या राजधानीतून जादा बस, वेळापत्रक
छत्रपती संभाजीनगर : नुकताच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा या संपल्या आहेत त्याचबरोबर आता उर्वरित जे विद्यार्थी आहेत त्यांच्या देखील लवकरच परीक्षा संपणार आहेत आणि सर्व शाळांना सुट्टी लागणार आहे. उन्हाळा सुट्टी म्हटले की मोठी गर्दी ही होती. या वाढत्या प्रवासी संख्येमुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात 764 जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. छत्रपती संभाजी नगर आगारातून देखील प्रवाशांसाठी अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत.
दहावी, बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. अकरावी ते पदवीच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांना 25 एप्रिलपर्यंत सुट्या लागणार आहेत. या सुट्यांमध्ये गावी, पर्यटनस्थळी, देवदर्शनाला जाण्याचे नियोजन केले जात आहे. लग्न सोहळ्याला जाण्याचा बेत आखला गेला आहे. यामुळे प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढत जाणार आहे. याचे भान ठेवून एसटी महामंडळाने एक महिना जादा बस चालवण्याचे नियोजन केले आहे.
advertisement
या मार्गांवर जादा बस
उन्हाळी सुट्टीसाठी  छत्रपती संभाजीनगर आगारातून 32 मार्गावर प्रवाशांच्या संख्येनुसार जादा बस सोडल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त लांबपल्ल्याच्या विविध मार्गांवर 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान या जादा बस धावणार असल्याने प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. शालेय विद्याथ्यर्थ्यांसाठी धावणाऱ्या बसेस विविध मार्गांवर सोडून प्रवाशांना सेवा प्रदान केली जाणार आहे. वैजापूर ते नाशिक, जळगाव, बुलडाणा, गंगापूर, शिर्डी, नाशिक, जळगाव आणि सोयगाव नाशिक जादा बस धावणार आहेत
advertisement
ऑनलाईन आरक्षण सुविधा
सुट्टी असल्यामुळे प्रवाशांची संख्या जास्त असते आणि यामुळे बसमध्ये बसण्यासाठी ऐनवेळी जागा मिळत नाही. उभे राहून लांब प्रवास करणे अशक्य आहे. त्यामुळे प्रवाशांकडून ऑनलाईन आगाऊ सीट आरक्षित केले जात आहे. एसटी महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल अॅप, एसटी महामंडळाच्या बसस्थानकावरील आरक्षण केंद्रावर जादा बसचे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
advertisement
असं असेल बसचं वेळापत्रक 
सिडको ते अकोला : 9.30, 11.00 वाजता
सिडको बस स्थानक ते रिसोड : सकाळी 7.30 वाजता
सिडको बस स्थानक ते मेहकर : सकाळी  9.30 वाजता
मध्यवर्ती बस स्थानक ते नागपूर : सकाळी 8.30 वाजता
मध्यवर्ती बस स्थानक ते अकोला : सकाळी 7.30 वाजता
पैठण ते पुणे : दुपारी 2.30 आणि 3.15 वाजता
advertisement
मध्यवर्ती बस स्थानक ते बुलडाणा : सकाळी 7, 8, 10.30, 11.30 वाजता
सिल्लोड पुणे : सकाळी 8 व 8.30 वाजता
मध्यवर्ती बस स्थानक ते धुळे : सकाळी 9.15 ते 9.45 वाजता
मध्यवर्ती बस स्थानक ते जळगाव : 10.15, 11.45, आणि 1 वाजता बस असेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
उन्हाळी सुट्टीत सुरक्षित प्रवास! ST चा मोठा निर्णय, पर्यटनाच्या राजधानीतून जादा बस, वेळापत्रक
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement