तुला मोबाईल कुणी दिला? एकच प्रश्न केला अन् रात्रीत पत्नीचा काटा काढला, पत्र्याच्या शेडमध्ये...
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Sambhajinagar Crime: मोबाईलच्या वादात पतीने पत्नीचा खून केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडलीये. याप्रकरणी पतीला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरूये.
छत्रपती संभाजीनगर : "तुला मोबाईल कुणी दिला?" म्हणत पतीने पत्नीचा खून केला. चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीने अमानुष मारहाण केली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोहंद्री (ता. कन्नड) येथे बुधवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पिंकाबाई संजय देवळे (वय 27, रा. बोरगाव, मध्य प्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती संजय महिकाल देवळे याला अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव येथील संजय व पिंकाबाई देवळे हे जोडपं मोहंद्री शिवारातील अच्युतराव जाधव यांच्या शेतात काम करत होते. शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ते राहत होते. मंगळवारी रात्री पती संजय याने पत्नी पिंकाबाईजवळ मोबाइल बघितला आणि "तुला मोबाईल कुणी दिला", अशी विचारणा केली. पिंकाबाईने काही एक उत्तर न दिल्याने रागाच्या भरात पतीने मोबाइल चुलीत टाकून दिला. या कारणावरून पती-पत्नीत जोरदार भांडण झाले. यावेळी पती संजय याने काठीने पत्नी पिंकाबाईला मारहाण करून तिचा गळा दाबला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पती घरातच झोपी गेला.
advertisement
दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी अच्युतराव जाधव यांना या वादाची माहिती देणारा फोन आल्याने ते शेतात गेले. तेव्हा त्यांना पिंकाबाई निपचीत पडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी आरोपी संजय देवळे व इतर काही लोकांच्या मदतीने पिंकाबाईला पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पंचनाम्यात पिंकाबाई हिच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसून आले. त्यामुळे त्यांनी आरोपी पती संजय देवळे याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने काठीने मारहाण करून गळा दाबल्याने पिंकाबाईचा खून केल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
दरम्यान, अच्युतराव जाधव यांच्या फिर्यादीवरून संजय देवळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संजय देवळे याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 22, 2025 2:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
तुला मोबाईल कुणी दिला? एकच प्रश्न केला अन् रात्रीत पत्नीचा काटा काढला, पत्र्याच्या शेडमध्ये...


