दिवाळीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर हादरले, दोन मित्रांनी मिळून जीवलग मित्राचा केला खून, CCTV समोर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: रामनगर भागात चाकूने भोसकून दोघांनी मित्राचा खून केला. मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात दिवाळीच्या दिवशीच एक थरारक खूनाची घटना उघडकीस आली आहे. रामनगर परिसरात दोन मित्रांनी मिळून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत विपुल चाबुकस्वार या तरुणाचा मृत्यू झाला असून, आशिष चौतमल आणि सुबोध देहाडे या दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, काही किरकोळ कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. वाद वाढताच आशिष चौतमल याने संतापाच्या भरात चाकू काढत विपुलवर हल्ला केला. त्याने एकाच चाकूने विपुलच्या अंगावर वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमांमुळे विपुलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या हल्ल्याचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यात आरोपी आशिष चौतमल चाकूने हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
दिवाळी सणाच्या दिवशीच घडलेल्या या खुनामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून पीडिताच्या कुटुंबाकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 21, 2025 8:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिवाळीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर हादरले, दोन मित्रांनी मिळून जीवलग मित्राचा केला खून, CCTV समोर