Rohit Sharma : जेव्हा रोहित संतापला, गिलला 25 कॅमेरांसमोरच झापलं, Live मॅचमधल्या ड्राम्याचा Video

Last Updated:

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून दोन्ही देशांमध्ये वनडे सीरिज सुरू आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला आहे, तर दुसरा सामना 23 ऑक्टोबरला ऍडलेडमध्ये खेळवला जाणार आहे.

जेव्हा रोहित संतापला, गिलला 25 कॅमेरांसमोरच झापलं, Live मॅचमधल्या ड्राम्याचा Video
जेव्हा रोहित संतापला, गिलला 25 कॅमेरांसमोरच झापलं, Live मॅचमधल्या ड्राम्याचा Video
मुंबई : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून दोन्ही देशांमध्ये वनडे सीरिज सुरू आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला आहे, तर दुसरा सामना 23 ऑक्टोबरला ऍडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व शुभमन गिल करत आहे. शुभमन गिल रोहित शर्मासोबत टीम इंडियाच्या बॅटिंगची सुरूवात करतो. या सीरिजमधूनच निवड समिती आणि बीसीसीआयने रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून गिलकडे दिली आहे. दरम्यान रोहित शर्माचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात रोहित गिलवर संतापल्याचं दिसत आहे.

रोहित शर्मा भडकला

हा व्हायरल व्हिडिओ भारत आणि अफगाणिस्तानमधील टी-20 सामन्यातील आहे. या सामन्यात रोहित शर्मा रन आऊट झाला होता. रोहित रन काढण्यासाठी धावला, पण नॉन स्ट्रायकर एन्डला उभा असलेला गिल त्याच्या क्रीजमध्येच राहिला, ज्यामुळे रोहितला त्याची विकेट गमवावी लागली. रोहित या सामन्यात 2 बॉल खेळून शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. आऊट झाल्यानंतर रोहित गिलवर संतापलेला दिसला.
advertisement
इनिंगच्या सुरूवातीलाच रोहित शर्माने मिड-ऑफच्या दिशेने शॉट मारला आणि तो रन काढण्यासाठी धावला, पण बॉल थेट फिल्डरकडे गेल्याचं पाहून गिल त्याच्या जागेवरून हललाच नाही. गिलने रोहितला थांबण्याचा इशाराही केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. फिल्डरच्या हातातून पहिल्या प्रयत्नात बॉल निसटला होता, पण नंतर त्याने विकेट कीपरच्या दिशेने थ्रो केला आणि रोहित आऊट झाला.
advertisement

टीम इंडियाने सामना जिंकला

2024 मध्ये खेळल्या गेलेल्या या टी-20 सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या अफगाणिस्तानने 158 रन केल्या. रोहित शर्मा शून्य रनवर आऊट झाला, तर गिलने 23 रन केल्या. या सामन्यात शिवम दुबेची बॅट तळपली आणि त्याने 40 बॉलमध्ये 60 रनची नाबाद खेळी केली, तसंच जितेश शर्मानेही 31 रन केले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : जेव्हा रोहित संतापला, गिलला 25 कॅमेरांसमोरच झापलं, Live मॅचमधल्या ड्राम्याचा Video
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement