लेकीपेक्षा आई निघाली चाप्टर! मनोरमा खेडकरच्या हुशारीमुळे पोलीसही वैतागले, फरार बापाचा वेगळाच ड्रामा!

Last Updated:

या प्रकरणातील एक महत्त्वाची साक्षीदार असलेल्या मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करीत नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

News18
News18
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी
नवी मुंबई: क्षुल्लक कारणावरून ड्रायव्हरचं अपहरण करून आपल्या बंगल्यावर डांबणाऱ्या खेडकर कुटुंबाची कोर्टात धावाधाव सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेली दिलीप खेडकर आता चुपचाप जामिनीसाठी कोर्टात प्रयत्न करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी बेलापूर कोर्टात जामिनीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
वादग्रस्त बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर याचे प्रताप कमी नाही तेच तिचे वडील दिलीप खेडकर याने एका तरुणाला बंगल्यावर डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला. ट्रकवर क्लिनर असलेल्या तरुणाला दिलीप खेडकर यांनी पुण्यातील बंगल्यात डांबून ठेवलं होतं. क्लिनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या मनोरमा खेडकरने पोलिसांना चकवा देत अटकपूर्व जामीन मिळवल्यानंतर आता आरोपी दिलीप खेडकर याना बेलापूर कोर्टात आज जामिनासाठी अर्ज केला.
advertisement
शनिवारी या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने हा जामीन देण्यास नकार दिला होता. क्लीनर अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकरने थेट वकिलासोबत न्यायालय गाठलं आणि अटकपूर्व जामीन मिळवला होता. आता या प्रकरणाच्या सुनावण्या सुरू असताना मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
संध्याकाळी ६ नंतर मनोरमा पोहोचली पोलीस स्टेशनला
या प्रकरणातील एक महत्त्वाची साक्षीदार असलेल्या मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करीत नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी तिला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना दिली होती. मात्र, निर्धारित वेळ संपल्यानंतर ती रबाळे पोलिसांकडे चौकशीसाठी पोहोचली. संध्याकाळी 6 नंतर महिलांची चौकशी करता येत नसल्याने या नियमाचा फायदा घेण्याचा मनोरमा खेडकर हिचा प्रयत्न असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य फिर्यादी प्रल्हाद कुमार भीतीमुळे गावाकडे निघून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दिलीप खेडकर अजूनही फरार आहे. पण जामिनासाठी प्रयत्न करत आहे. या प्रकरणी  पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
दिलीप खेडकर आणि त्यांचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे यांनी मिळून तरुणाचे अपहरण केलं होतं. नवी मुंबई पोलिसांकडून तरुणाची सुखरूप सुटक केली असून नुकसानभरपाईच्या वादावरून अपहरण केल्याचं समोर आलं होतं. १४ सप्टेंबरला मुलुंड ते ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझर गाडीमध्ये अपघात झाला होता. मिक्सर वाहन घेऊन जाणाऱ्या तरुणाची गाडी आणि खेडकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याने दोघांमध्ये वाद झाला. नुकसानभरपाईचे पैसे न दिल्याने खेडकर यांचा पारा चढला. तरुणाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे सांगत थेट पुण्याच्या घरी नेऊन डांबून ठेवले.
advertisement
डंपर चालकाच्या सहकाऱ्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर रबाळे पोलिसांनी एक पथक गाडीचा मागोवा घेत गेले. कारचा मागोवा घेत MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझरचा शोध घेतला, ती गाडी पुण्यातील बाणेर रस्त्यावरील एका बंगल्याबाहेर उभी असल्याचे निष्पन्न झाले. हा बंगला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा असल्याचे समोर आलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लेकीपेक्षा आई निघाली चाप्टर! मनोरमा खेडकरच्या हुशारीमुळे पोलीसही वैतागले, फरार बापाचा वेगळाच ड्रामा!
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement