उल्हासनगरमध्ये आधी तुम्ही सुरू केलं... मुख्यमंत्र्यांचा संताप, ते नेमकं प्रकरण काय?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
BJP vs Shiv Sena: सेना मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याने सेना-भाजपमधला वाद चव्हाट्यावर आला आहे.
मुंबई : ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमधला संघर्ष उफाळून आलाय. एकमेकांच्या पक्षातील माणसांनाच फोडूनच पक्षप्रवेश दिले जात आहेत. त्यामुळे त्या त्या पक्षांनी जुळवलेले गणित निवडणुकीआधी फिस्कटून गेले आहे. सेना मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याने सेना-भाजपमधला वाद चव्हाट्यावर आला आहे.
सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदी मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीवर नाराजी व्यक्त केली. त्यावर उल्हासनगरमध्ये तुम्ही आधी सुरुवात केली, असे सांगत सेना मंत्र्यांची तोंडं मुख्यमंत्री फडणवीस यांनी गप्प केली.
उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरू केलं! मुख्यमंत्र्यांचा संताप
यानंतर उल्हासनगर मधून भाजपाचे नगरसेवक आणि भाजपाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांसोबत शिवसेनेने जुळवून घेतले तसेच ओमी कलानी आणि इतर स्थानिक पक्ष तर, उल्हासनगर मधीलच भाजपाचे नगरसेवक ज्यांना पक्षातून बडतर्फ केले जाणार होते त्यांना शिवसेनेने घेतले. याच पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत आक्षेप घेतला.
advertisement
-भाजपाचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी तसेच ८ नगरसेवक शिवसेनेने फोडले.
-कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीकरता-भाजपाने निश्चित केलेले उमेदवार शिवसेनेने घेतले
-यानंतर उल्हासनगर मधून भाजपाचे नगरसेवक आणि भाजपाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांसोबत शिवसेनेने जुळवून घेतले तसेच ओमी कलानी आणि इतर स्थानिक पक्ष तर, उल्हासनगर मधीलच भाजपाचे नगरसेवक ज्यांना पक्षातून बडतर्फ केले जाणार होते त्यांना शिवसेनेने घेतले
advertisement
-याचा वचपा म्हणून ओमी कलानी यांच्या सोबतचे ७-८ नगरसेवक भाजपाने घेतले
-यानंतर अंबरनाथमधून शिवसेना सोडणारे शिवसैनिक यांना भाजपाने आपल्या गळाला लावले
-यानंतर प्रकाश निकम, पालघर जिल्हा परिषदेचे अपक्ष होते ते शिवसेनेसाठी अनुकूल होते, त्यांना भाजपाने आपल्याकडे वळवले
-पालघर शिवसेनेचे उबाठाचे कैलास म्हात्रे शिवसेनेत (शिंदे गट) जाणार होते, त्यांना भाजपाने आपल्या गळाला लावले
advertisement
-याचा वचपा म्हणून डोंबिवलीचे भाजपाचे विकास म्हात्रे आणि तीन नगरसेवक शिवसेनेने आपल्या गळाला लावले
तसेच अंबरनाथ मधील भाजपाचे नगरसेवक शिवसेनेने आपल्या पक्षात घेतले
आणि आज शिवसेनेचे महेश पाटील, सुनिता पाटील, अनमोल म्हात्रे, सायली विचारे, संजय विचारे नगरसेवक यांचा भाजपाने पक्ष प्रवेश केला
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
उल्हासनगरमध्ये आधी तुम्ही सुरुवात केली. तुम्ही केले ते चालतं, आम्ही केलं ते वाईट असतं. असं कसं चालेल? नियम दोन्ही पक्षांनी पाळले पाहिजेत. एकट्याने नियम पाळून चालणार नाही, अशा शब्दात शिवसेना मंत्र्यांना सुनावत आतापासून दोन्ही पक्षांनी नियम पाळावेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 4:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उल्हासनगरमध्ये आधी तुम्ही सुरू केलं... मुख्यमंत्र्यांचा संताप, ते नेमकं प्रकरण काय?


