Aaryavir Sehwag : बाप शेर, तर पोरगा सव्वाशेर... सेहवागच्या मुलाने दाणादाण उडवली, एकहाती विजय खेचून आणला!

Last Updated:

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॅटर असणाऱ्या सेहवागच्या मुलाने त्याच्या टीमला विजय मिळवून दिला आहे.

बाप शेर, तर पोरगा सव्वाशेर... सेहवागच्या मुलाने दाणादाण उडवली, एकहाती विजय खेचून आणला!
बाप शेर, तर पोरगा सव्वाशेर... सेहवागच्या मुलाने दाणादाण उडवली, एकहाती विजय खेचून आणला!
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॅटर असणाऱ्या सेहवागच्या मुलाने त्याच्या टीमला विजय मिळवून दिला आहे. कुच बिहार ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या आर्यवीर सेहवागने बिहारच्या बॉलिंगवर आक्रण केलं आणि मॅचमध्ये एकूण 99 रन करून टीमला 8 विकेटने विजय मिळवून दिला. आर्यवीर सेहवागशिवाय फास्ट बॉलर लक्ष्मणने भेगक बॉलिंग करत एकूण 11 विकेट घेतल्या. लक्ष्मणने पहिल्या इनिंगमध्ये 7 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट मिळवल्या.

सेहवागचा मुलगा चमकला

पालमच्या एअरफोर्स कॉम्प्लेक्स ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात दिल्लीची सुरूवात खराब झाली. आराध्य चावला फक्त 4 रन करून आऊट झाला, तर तन्मय चौधरी शून्य रनवर माघारी परतला. यानंतर आर्यवीर सेहवागने कर्णधार प्रणव पंतसोबत शतकी पार्टनरशीप केली, या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 147 रन जोडले, पण दोघांनाही शतक करता आलं नाही. आर्यवीर 72 रनवर आणि प्रणव पंत 89 रनवर आऊट झाला. दिल्लीने पहिल्या इनिंगमध्ये 278 रन केले.
advertisement

बिहारचा 125 वर ऑलआऊट

यानंतर बॅटिंगला आलेल्या बिहारचा 125 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे बिहारला फॉलोऑन मिळाला. दुसऱ्या इनिंगमध्ये बिहारला 205 रन करता आले, त्यामुळे दिल्लीला विजयासाठी 53 रनचं आव्हान मिळालं, जे त्यांनी 2 विकेट गमावून 15.2 ओव्हरमध्ये पार केलं. आर्यवीरने दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 27 रन केले आणि दिल्लीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आर्यवीरने मॅचमध्ये एकूण 99 रनचं योगदान दिलं.
advertisement

आर्यवीर सेहवागचं करिअर

आर्यवीर सेहवाग 2023 पासून एज-ग्रुप क्रिकेटमध्ये ऍक्टिव्ह आहे. क्रिकहिरोजच्या माहितीनुसार आर्यवीरने 61 मॅच खेळल्या, ज्यात त्याच्या नावावर 2103 रन आहेत. आर्यवीर सेहवागने मागच्या वर्षी कूच बिहार ट्रॉफीमध्ये द्विशतक करून चर्चेत आला होता. मेघालयविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 200 रन केले होते. मेघालयविरुद्ध त्याने 297 रनची खेळीही केली होती. याशिवाय तो दिल्ली प्रीमियर लीगमध्येही खेळला, सेंट्रल दिल्ली किंग्सने त्याला 8 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Aaryavir Sehwag : बाप शेर, तर पोरगा सव्वाशेर... सेहवागच्या मुलाने दाणादाण उडवली, एकहाती विजय खेचून आणला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement