रोहित पवारांचा स्फोटक आरोप; 'काँग्रेस भाजपची बी-टीम, नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा?'

Last Updated:

'महत्त्वाचं म्हणजे काही अपक्षांनी तसंच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं

News18
News18
मुंबई:  महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास आता स्पष्ट झालं आहे. महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र वेगळं चित्र पाहण्यास मिळालं. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहे. काँग्रेसच्या या विजयावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केला आहे. 'काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला' अशी जळजळीत टीका रोहित पवार यांनी केली आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक ३२ जागा जिंकल्या आहे. काँग्रेसच्या विजयावर रोहित पवार यांनी ट्वीट करून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
'महत्त्वाचं म्हणजे काही अपक्षांनी तसंच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकंही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळं यापुढं काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा? असा सवालच रोहित पवार यांनी उपस्थितीत केला.
advertisement
तसंच, 'आज तत्व आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी आणि पैशांनी गढूळ झालेलंच अधिक दिसतं. म्हणूनच आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले तर चारचौघात त्या धंद्यांचं नाव घेण्याचीही लाज वाटते. मग अशा परिस्थितीत डोक्यात विचारांचं काहूर उठल्याशिवाय राहत नाही' अशी नाराजीही रोहित पवारांनी व्यक्त केली.
तसंच, जनतेनं दोनदा मतांचं दान भरभरुन पदरात टाकलं, त्यांच्या मी कायम ऋणात राहिल, पण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवली तरी आज लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. जनतेवर आक्षेप नाही पण सगळीकडे पैसाच चालत असेल तर बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि इतर अशा राजकीय दृष्टीकोनातून दुर्लक्षित आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना न्याय कधी मिळणार, हाही प्रश्न आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रोहित पवारांचा स्फोटक आरोप; 'काँग्रेस भाजपची बी-टीम, नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा?'
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement