सिंमेट स्वस्त पण विट सळईचं काय? नवीन GST सुधारणेचा बांधकाम व्यवसायाला किती फायदा
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
22 सप्टेंबरपासून जीएसटी दरामध्ये कपात झाल्यानंतर अनेक घरगुती वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. बांधकाम व्यवसायातील अनेक वस्तू जसे की सिमेंट वीट वाळू इत्यादीच्या दरावर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळतंय.
22 सप्टेंबरपासून जीएसटी दरामध्ये कपात झाल्यानंतर अनेक घरगुती वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. बांधकाम व्यवसायातील अनेक वस्तू जसे की सिमेंट वीट वाळू इत्यादीच्या दरावर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळतंय. सिमेंटच्या दरामध्ये घट झाली आहे. तर सळई आणि इतर साहित्याच्या बाबतीत काय स्थिती आहे, हे आम्ही जालना शहरातील स्टील उद्योजक विजय दाड यांच्याकडून जाणून घेतलं पाहूयात.
केंद्र सरकारने 22 सप्टेंबर रोजी घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण व्यापारी वर्ग स्वागत करतो. यामुळे घरगुती वापराच्या अनेक वस्तू स्वस्त झाले आहेत त्याचबरोबर वाहने देखील स्वस्त झाली आहेत. बांधकाम व्यवसायाला देखील या निर्णयामुळे फायदा होणार आहे. सिमेंटच्या दरामध्ये देखील लक्षनीय घट झाले आहे. प्रति गोणी 10 ते 15 रुपयांचा फरक सिमेंट दरामध्ये पाहायला मिळतोय. बांधकाम व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर सळईचा वापर होतो. सळईवरील जीएसटी हा 18% एवढा कायम ठेवण्यात आला आहे.
advertisement
परंतु सळई निर्मितीसाठी लागणारा कोळसा 5% वरून 18% पर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे सळईच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सळीला पाच हजार रुपये क्विंटल असा दर मिळत आहे हाच दर पाच हजार तीनशे रुपयांपर्यंत वाढू शकतो अशी शक्यता स्टील उद्योजक विजय दाड यांनी वर्तवली आहे. दरम्यान बांधकाम क्षेत्रातील वीट वाळू किंवा अन्य वस्तूंच्या दरामध्ये फारसा फरक पडणार नाही परंतु सिमेंट स्वस्त झाल्याने व्यावसायिकांना नक्कीच फायदा होईल. तर कोळशावरील जीएसटी वाढवल्याने सळईच्या दरामध्ये मात्र किंचित वाढ होण्याची शक्यता दाढ यांनी वर्तवली आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 01, 2025 8:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिंमेट स्वस्त पण विट सळईचं काय? नवीन GST सुधारणेचा बांधकाम व्यवसायाला किती फायदा