advertisement

दुधनी नगरपरिषद मतमोजणीत मोठा गोंधळ; स्ट्राँग रूमची चावी हरवल्याने अखेर कुलूप तोडले

Last Updated:

Dudhani Municipal Council: दुधनी नगरपरिषदेच्या स्ट्रॉंग रूमची चावी हरवल्याने मतमोजणीच्या दिवशी मोठा गोंधळ उडाला. अखेर प्रशासनाने कुलूप तोडून मतमोजणीची प्रक्रिया उशिराने सुरू केली आहे.

News18
News18
सोलापूर: महाराष्ट्रभरातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असताना सोलापूर जिल्ह्यातील दुधनी नगरपालिकेत मात्र सुरुवातीलाच मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मतमोजणीसाठी सज्ज असलेल्या प्रशासनाची त्यावेळी मोठी फजिती झाली, जेव्हा महत्त्वाच्या स्ट्राँग रूमची चावीच गहाळ असल्याचे समोर आले. यामुळे नियोजित वेळेत मतमोजणी सुरू होऊ शकली नाही.
नेमकी घटना काय?
आज सकाळी १० वाजल्यापासून राज्यभरात मतमोजणीला सुरुवात झाली. दुधनी नगरपरिषदेसाठी देखील निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणी केंद्रावर हजर झाले होते. मात्र, ज्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन (EVM) सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या, त्या खोलीची चावी वेळेवर सापडली नाही. बराच वेळ शोध घेऊनही चावी न मिळाल्याने अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.
advertisement
अखेर कुलूप तोडण्याचा निर्णय
मतमोजणीला विलंब होत असल्याचे पाहून आणि उपस्थित उमेदवारांचा संयम सुटत असल्याचे लक्षात घेता, प्रशासनाने अखेर मोठा निर्णय घेतला. निवडणूक नियमावलीनुसार आणि उपस्थित अधिकृत प्रतिनिधींच्या साक्षीने स्ट्राँग रूमचे कुलूप तोडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे जेणेकरून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये.
मतमोजणीला विलंब
राज्यात इतर ठिकाणी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असताना, दुधनीमध्ये मात्र या गोंधळामुळे मतमोजणी प्रक्रिया रखडली होती. चावी हरवल्याच्या या प्रकारामुळे प्रशासकीय बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
advertisement
उमेदवारांची धाकधूक: निकालाला उशीर होत असल्याने उमेदवार आणि समर्थकांमध्ये धाकधूक वाढली असून केंद्राबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता असून, चावी नेमकी कोणाकडे होती आणि ती कशी गहाळ झाली, याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवला जाऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दुधनी नगरपरिषद मतमोजणीत मोठा गोंधळ; स्ट्राँग रूमची चावी हरवल्याने अखेर कुलूप तोडले
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement