Thane Theater: खर्च 60 कोटींचा गुणवत्ता मात्र फुसकी! घाणेकर नाट्यगृहावर आली नूतनीकरणाची वेळ
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Thane Theater: 25 एप्रिल 2012 रोजी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं छत कोसळलं होते. त्यानंतर महापालिकेनं दुरुस्ती पूर्ण करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी घेतला.
ठाणे: ठाण्यातील नाट्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची दुरुस्ती केली जाणार आहे. मात्र, 15 वर्षात अनेकदा दुरुस्तीची वेळ आल्याने मोठ्या प्रमाणात टिका देखील केली जात आहे. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसह इतर कामांसाठी सरकारने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणादरम्यान संपूर्ण वास्तूची डागडुजी, तुटलेल्या खुर्च्या बदलणे, पडदे बदलणे, स्वच्छतागृहे, व्हीआयपी कक्षाची दुरुस्ती, कार्पेट बदलणे, सुरक्षा केबिन, वातानुकूलित यंत्रणेची दुरुस्ती आणि इतर तांत्रिक व अंतर्गत सुविधांची सुधारणा करणे इत्यादी कामं केली जाणार आहेत.
advertisement
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाट्यरसिकांसाठी घोडबंदरजवळ असलेल्या हिरानंदानी मेडोज परिसरात डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची उभारणी केली होती. सुमारे 60 कोटी खर्चून हिरानंदानी बिल्डरच्या माध्यमातून हे नाट्यगृह बांधण्यात आलं होतं. मुख्य नाट्यगृहाची क्षमता 1,095 आणि लघुनाट्यगृहाची क्षमता 182 इतकी आहे. 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी नागरिकांसाठी ते खुलं करण्यात आलं होतं. तेव्हापासून या नाट्यगृहाच्या मागे अनेकदा दुरुस्तीचं शुक्लकाष्ठ लागलं आहे.
advertisement
लोकार्पणानंतर काही महिन्यांतच, 25 एप्रिल 2012 रोजी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं छत कोसळलं होते. त्यानंतर महापालिकेनं दुरुस्ती पूर्ण करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी घेतला. या कालावधीत नाट्यगृह बंद ठेवलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी लघुनाट्यगृहात गळती सुरू झाली होती. मध्यंतरी मुख्य छतातून देखील गळती सुरू होती. वारंवार निर्माण होणाऱ्या समस्या आणि दुरुस्तीमुळे नाट्यगृहाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह प्रश्न उपस्थित केलं जात आहे.
advertisement
ठाण्याचे मनपा उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कलाकार आणि नाट्यरसिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी इच्छा आहे. त्या दृष्टिकोनातून नाट्यगृहाचं नूतनीकरण केलं जात आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 25, 2025 11:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Theater: खर्च 60 कोटींचा गुणवत्ता मात्र फुसकी! घाणेकर नाट्यगृहावर आली नूतनीकरणाची वेळ