शिंदेसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार म्हणतात, उद्धव ठाकरे माझ्या हृदयात, घरातून फोटोही काढणार नाही
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
शिंदेसेनेत प्रवेश केलेला असला तरी दगडू सकपाळ यांच्या मनात ठाकरे कुटुंबाचे स्थान अबाधित आहे.
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : मुंबई मनपा निवडणुकीला काहीच दिवस उरले असताना ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. लालबाग परळ भागातील मोठे नेते, माजी आमदार दगडू सकपाळ यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिंदेसेनेत प्रवेश केलेला असला तरी दगडू सकपाळ यांच्या मनात ठाकरे कुटुंबाचे स्थान अबाधित आहे. पक्ष बदलला असला तरी मी ठाकरेंवर टीका करणार नसल्याची भूमिका घेत ठाकरेंनी मला घर दिलं, मला आमदार केलं, मला राजकारणात टिकवून ठेवलं, असं दगडू सपकाळ म्हणाले.
त्याच वेळी त्यांच्या घरात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या फोटोबद्दल विचारणा केली असता, मी तो फोटो काढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरेंसाठी मनात ओलावा असला तरी संजय राऊत यांच्यावर त्यांनी नाव न घेता टीका केली. आम्हाला गद्दार म्हणतील आता पण खुद्दारानेच वाट लावली, असे दगडू सकपाळ म्हणाले.
advertisement
दगडू सकपाळ यांनी आज सकाळी १० वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मुलीला तिकीट न दिल्याने माजी आमदार दगडू सकपाळ हे नाराज होते. त्यांनी माध्यमांसमोर अतिशय भावुक होत प्रतिक्रिया दिल्या होत्या. मी म्हातारा झालो, आता माझा पक्षाला उपयोग वाटत नसेल पण तरुणपणात मी पक्षासाठी सर्वस्व दिल्याची आठवण सपकाळ यांनी पक्षाला करून दिली. त्याचवेळी त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०३ मधून इच्छुक होत्या. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तिकीट नाकारल्याने रेश्मा सकपाळ यांनी निवडणुकीच्या रणांगणातून माघार घेतली. मुलीला माघार घ्यावी लागल्याने दगडू सपकाळ प्रचंड नाराज झाले होते.
advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसापूर्वी दगडू सकपाळ यांची त्यांच्या परळ येथील राहत्या घरी भेट घेतली होती. याच भेटीत एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश करण्यासाठी बोलणी केली. विचार करून कळवतो, असे सपकाळ यांनी त्यावेळी सांगितले. अखेर विचाराअंती सपकाळ यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदेसेनेत प्रवेश केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 7:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिंदेसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार म्हणतात, उद्धव ठाकरे माझ्या हृदयात, घरातून फोटोही काढणार नाही











