Iron Man Competition: हाडं गोठवणारी थंडी अन् तीव्र चढण, तरी मानली नाही हार! छत्रपती संभाजीनगरचा तरुण झाला 'आयर्न मॅन'
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Iron Man Competition: आयर्न मॅन ही स्पर्धा शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी घेणारी असते. या स्पर्धेत दर्शनने उल्लेखनीय कामगिरी केली.
छत्रपती संभाजीनगर : 'आयर्न मॅन' स्पर्धा ही अतिशय आव्हानात्मक ट्रायथलॉन स्पर्धा मानली जाते. कारण या स्पर्धेत निश्चित वेळेत पोहणे, सायकलिंग आणि धावणे यांचा तिन्ही क्रिया पूर्ण कराव्या लागतात. ही स्पर्धा शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी घेणारी असते. यात खूप कष्ट आणि चिकाटी लागते. प्रतिकूल परिस्थितीतही हे आव्हान पूर्ण करावे लागते. अशी ही अवघड स्पर्धा छत्रपती संभाजीनगरमधील दर्शन घोरपडे याने पूर्ण केली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील दर्शनने नुकत्याच स्वीडन येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत जगभरातील 3 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात 3.8 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग या तिन्ही क्रिया 16 तासांच्या आत पूर्ण करणे आवश्यक होतं. 21 वर्षांच्या दर्शन घोरपडेने हे आव्हान 15 तास 1 मिनिट आणि 15 सेकंदांत यशस्वीपणे पूर्ण केलं.
advertisement
दर्शनने 19 डिग्री तापमानामध्ये कडाक्याच्या थंडीत 3.8 किलोमीटर स्विमिंग 1 तास 43 मिनिटे 5 सेकंदांत पूर्ण केलं. त्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग 7 तास आणि 25 सेकंदांत पूर्ण केली. विशेष म्हणजे सायकलिंग करताना 6 किलोमीटर रस्ता हा तीव्र चढण असलेला होता. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात त्याने 42 किलोमीटर रनिंगचे 5 तास 51 मिनिटांत पूर्ण केली.
advertisement
दर्शन म्हणाला, "या स्पर्धेमध्ये मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, वातावरणात खूप बदल होता. वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागला. पण, मी सगळं व्यवस्थित हँडल केलं. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये माझे वडील देखील माझ्यासोबत होते. त्यांनी देखील स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, त्यामुळे मला जास्त आत्मविश्वास होता. मला या स्पर्धेमध्ये माझ्या वडिलांनी खूप मदत केली आहे. त्यामुळेच मी ही स्पर्धा पूर्ण करू शकलो."
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 23, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Iron Man Competition: हाडं गोठवणारी थंडी अन् तीव्र चढण, तरी मानली नाही हार! छत्रपती संभाजीनगरचा तरुण झाला 'आयर्न मॅन'