पूजा खेडकर प्रकरण म्हणजे UPSC नाही तर समाजाची फसवणूक, कोर्टाने सुनावले अन् जामीन पण फेटाळला
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे.
नवी दिल्ली : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला (Pooja Khedkar) दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तसेच पूजा खेडकरला उच्च न्यायालयाने खडे बोल देखील सुनावले आहे. पूजा खेडकर प्रकरण म्हणजे केवळ UPSC च नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक असे न्यायलयाने सुनावले आहे. कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे.
Delhi High Court refuses to grant the anticipatory bail plea of former IAS Probationer Puja Khedkar, stating that the UPSC is regarded as a prestigious examination. It further observed that the incident in question represents a fraud not only against an organization but also…
— ANI (@ANI) December 23, 2024
advertisement
पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. पूजा खेडकर यांच्या विरोधात युपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली क्राईम ब्रान्चने एफआयआर नोंदवून घेतली होती. त्यानंतर पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी पटियाला कोर्टात गेल्या होत्या. त्यावेळी पटियाला हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. तसेच या प्रकरणातील गुन्हेगारी उलगडण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.
advertisement
पूजा खेडकरांना कधीही अटक होऊ शकते
दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना प्रत्येक तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. जवळपास आठ ते दहा वेळा सुनावणी झाली . अखेर महिन्याभरानंतर पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यूपीएससीच्या तक्रारीनुसार दिल्ली पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला होता त्यानुसार पूजा खेडकरांना कधीही अटक होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2024 3:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पूजा खेडकर प्रकरण म्हणजे UPSC नाही तर समाजाची फसवणूक, कोर्टाने सुनावले अन् जामीन पण फेटाळला










