धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण, बजरंगबाप्पा भडकले; म्हणाले लय आठवण येत असेल तर...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
धनंजय मुंडेंना आलेल्या या कळवळ्याबद्दल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांसह विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
बीड : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे.त्यामागचं कारण म्हणजे त्यांनी परळीतील प्रचार मेळाव्यात वाल्मिक कराडची आठवण काढली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अद्याप वर्षही पूर्ण झाले नाही त्याआधीच धनंजय मुंडे वाल्मिक कराडचे नाव जाहीर सभेत घेतले. धनंजय मुंडेंना आलेल्या या कळवळ्याबद्दल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांसह
विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील सडकून टीका केली आहे.
धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात परळीतील जगमित्र कार्यालयाचा उल्लेख केला.याच कार्यालयात बसून वाल्मिक कराड सगळा कारभार हाकत होता. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा वाल्मिक कराडवर आरोप आहे. कराडच्या साथिदारांनी संतोष देशमुखची निर्घृण हत्या केली. सध्या कराड या प्रकरणी तुरुंगाची हवा खातोय. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची जवळीक काही लपून राहिली नाही. त्यावरून धनंजय मुंडेंवर बरेच आरोपही झाले होते. पण आता नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण झाली.
advertisement
खासदार बजरंग सोनावणे काय म्हणाले?
यावर बजरंग सोनावणे म्हणाले, धनंजय मुंडे यांना आज जर कोणाची लई जास्त आठवण येत असेल तर त्यांनी तिथे जाऊन बसावं त्यांना भेटावं... आमचं काही म्हणणं नाही. मागच्या दोन निवडणुकीमध्ये परळीतील नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार देखील बजाऊ दिला नाही. दादागिरी दहशत बरेच काही प्रकार करून परळीच्या जनतेला फक्त बोटाला शाई लावली.मतदान करू दिले नाही. धनंजय मुंडेला आज जर कोणाची लय जास्त आठवण येत असेल तर त्यांनी तिथे जाऊन बसावं त्यांना भेटावं आमचं काही म्हणणं नाही.
advertisement
काय आहे प्रकरण?
गेल्या डिसेंबर महिन्यात पवनचक्कीच्या वादातून संतोष देशमुख यांची निघृर्ण हत्या झाली होती. या हत्याप्रकरण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर एक आरोपी फरार आहे. वाल्मिक कराड हा या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधामुळं धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागलं. गेल्या वर्षभराच्या काळात आपल्या बदनामीचा प्रयत्न झाल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे.
advertisement
धनंजय मुंडेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं
तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडविषयी धनंजय मुंडेंना कळवळा आल्यानं विरोधकांसह सामाजिक
कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले होते. त्यावरून धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं होतं. पण आता धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 4:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण, बजरंगबाप्पा भडकले; म्हणाले लय आठवण येत असेल तर...


