Dharashiv: कॉलेजच्या तरुणांमध्ये कोयता कतीने हाणामारी, राड्यात दोन मुलं गंभीर जखमी

Last Updated:

Dharashiv News: महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादात बाहेरच्या काही तरुणांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती चिघळली.

धाराशिव
धाराशिव
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : परंडा शहरातील रा गे शिंदे महाविद्यालयाच्या परिसरात दोन गटांमध्ये कोयता-कातीने हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली. या धक्कादायक प्रकारात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, परंडा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादात बाहेरच्या काही तरुणांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती चिघळली. पाहता पाहता दोन गट समोरासमोर आले आणि परिसरात कोयता-कातीने हाणामारी सुरू झाली.
या हाणामारीत चैतन्य शेळके हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर वाळू तस्करी, बंदूक लावून धमकावणे यांसारखे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते. तसेच तो धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतून तडीपार असल्याची देखील माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जखमींना उपचारासाठी दाखल केले. नेमके भांडण कोणत्या कारणावरून झाले, त्यात किती तरुण सहभागी होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परंडा शहरासह महाविद्यालयीन परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv: कॉलेजच्या तरुणांमध्ये कोयता कतीने हाणामारी, राड्यात दोन मुलं गंभीर जखमी
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement