40 लाख रुपयांच्या बंगल्यावर बनवला जेसीबी, फळबागही फुलवली; धाराशिवमधील प्रेरणादायी गोष्ट!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
धाराशिव जिल्ह्यातिल परंडा तालुक्यातील पाच पिंपळा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हनुमंत बारसकर यांची ही कहाणी आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा असतो. प्रत्येकाची कहाणी ही वेगळी असते. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. या व्यक्तीचा जवळपास 40 लाख रुपयांचा बंगला आहे आणि या बंगल्यावर त्यांनी जेसीबीची भव्य प्रतिकृती तयार केली आहे. हा जेसीबी जणू काही जेसीबी ऑपरेटर म्हणून काम केलेल्या हनुमंत बारस्कर यांच्या संघर्षाची यशोगाथा अभिमानाने सांगत आहे.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातिल परंडा तालुक्यातील पाच पिंपळा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हनुमंत बारसकर यांची ही कहाणी आहे. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ म्हणजे शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजला आहे. दुष्काळ आणि नापीकेला कंटाळुन हनुमंत बारस्कर यांचे आई वडील बारामतीला कामाला गेले. त्या ठिकाणी हनुमंत बारस्कर यांनी जेसीबी चालवण्याचा प्रशिक्षण घेतलं आणि जेसीबी ऑपरेटर म्हणून कामाला सुरुवात केली.
advertisement
मित्रांच्या मदतीने पापड उद्योग सुरू, सुरुवातीला तोटा, पण पुन्हा उभारी, आज 180 महिलांना मिळतोय रोजगार
सुरुवातीला त्यांना 700 रुपये महिना पगार मिळाला. त्यानंतर पगार वाढत गेला. त्याठिकाणी त्यांनी 4 वर्षे ऑपरेटर म्हणून काम केले आणि ते गावाकडे आले. त्यानंतर त्यांनी कमिशनवर जेसीबी मशीन चालवण्यास घेतले. त्यातून काही पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी स्वतःची जेसीबी मशीन विकत घेतली आणि आता त्यांना वर्षाकाठी 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
advertisement
जेसीबी ऑपरेटर म्हणून काम केलेल्या हनुमंत बारस्कर यांनी चक्क घरावर जेसीबीची प्रतिकृती बनवली आहे. ही प्रतिकृती आरसीसी बांधकामाची असून यामध्ये त्यांनी पाण्याची टाकी देखील बनवली आहे. त्या प्रतिकृतीमध्ये 2 ते अडीच हजार लीटर पाणी बसते. यामुळे पाण्याच्या टाकीचा प्रश्नही मिटला आणि ज्या मशीनने आपल्याला आज इथपर्यंत आणलं त्या मशीनची प्रतिकृती त्यांनी अभिमानाने घरावर बनवली.
advertisement
यासोबतच ते आज आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यांनी आपल्या शेतात डाळिंब, पेरू यासारख्या फळबागांची लागवड केली. त्यातूनही त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळते आहे. दिमाखात बंगल्यावर असलेला हा जेसीबी हनुमंत बारस्कर यांचा संघर्ष भल्या मोठा अभिमानाने सांगतो, असे दिसून येते.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 02, 2024 3:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
40 लाख रुपयांच्या बंगल्यावर बनवला जेसीबी, फळबागही फुलवली; धाराशिवमधील प्रेरणादायी गोष्ट!