Dharashiv : विश्वसंत म्हणून मिरवणाऱ्या लोमटे महाराजाला पुन्हा अटक; आधी बलात्कार प्रकरण, आता...

Last Updated:

बलात्कार प्रकरणी आधीच न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या लोमटे महाराजाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

News18
News18
बालाजी निरफळ, धाराशिव, 25 ऑगस्ट : बलात्कार प्रकरणी आधीच न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या लोमटे महाराजाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे करून सरकारची फसवणूक केल्याबद्दल त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून येरमाळा पोलिसांनी त्याला अटक केलीय.
लोमटे महाराजाकडून फसवणूक करण्यात आल्याची बामती न्यूज१८ लोकमतने दाखवली होती. कळंब तालुक्यातल्या श्री दत्तमंदिर तीर्थक्षेत्र, मलकापूरमधील एकनाथ लोमटे महाराजाने ग्रामपंचायतीचा बनावट प्रस्ताव तयार केला होता. त्यातून सरकारला एक कोटी दहा लाख निधीची फसवणूक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी मलकापूरचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह अनेक आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
दरम्यान, सरपंचांनी दिलेल्या जबाबात लोमटे महाराजाचे नाव घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी लोमटे महाराजाला अटक करण्यात आलीय. याप्रकरणी लोमटे महाराजाला न्यायालयात हजर केले जाणार आहे. आधीच बलात्काराचे प्रकरणी गुन्हा असताना त्यातच आणखी एक कारनामा उघड झाला आहे. आता आणखी काही प्रकरणे उजेडात येणार का अशीची चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या/धाराशिव/
Dharashiv : विश्वसंत म्हणून मिरवणाऱ्या लोमटे महाराजाला पुन्हा अटक; आधी बलात्कार प्रकरण, आता...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement