तब्बल 80 लाखांचा बंगला बांधला, त्यावर ठेवली अशी गोष्ट की, बघणारे राहतात बघतच!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी मोठ्या कष्टानं आपल्या कुटुंबियांसाठी सुखाचे दिवस आणले. आज महिन्याकाठी त्यांची उलाढाल आहे जवळपास दीड लाख रुपयांची.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : एक दिवस आपणही मोठं घर घ्यायचं, एक दिवस आपणही मोठा बंगला बांधायचा, असं स्वप्न अनेकजणांनी उराशी बाळगलेलं असतं. परंतु त्यासाठी कष्ट करण्याची तयारी मात्र फार कमीजणांच्या मनगटात असते. अशोक भिलारे हे यापैकी एक. कधीकाळी साधा मेकॅनिक म्हणून हातावर पोट अशी त्यांची परिस्थिती होती. मात्र हार न मानता प्रामाणिकपणे काम करत राहिल्यामुळे आज त्यांनी तब्बल 80 लाख रुपयांचा बंगला बांधलाय. या बंगल्यालाही त्यांनी असा टच दिलाय की, आपली सुरूवात कुठून झाली याचा विसर त्यांना कधीच पडणार नाही.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याच्या अनाळाचे रहिवासी अशोक भिलारे. व्यवसायानं ते ट्रॅक्टर मेकॅनिक. मूळ परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील त्यांचं कुटुंब, मात्र ते अनाळला स्थायिक झाले. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घर सांभाळण्यासाठीच त्यांनी ट्रॅक्टर दुरुस्तीचं प्रशिक्षण घेतलं.
advertisement
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनाळमध्ये ट्रॅक्टर दुरुस्तीचं एक लहान गॅरेज सुरू केलं. हळूहळू त्यांच्या व्यवसायाची भरभराट होत गेली. बंडेवार ट्रॅक्टर धाराशिव यांनी ट्रॅक्टर विक्रीचं आणि दुरुस्तीचं काम भिलारे यांना दिलं, त्यामुळे त्यांची प्रगती होतच गेली. अशाप्रकारे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून भिलारे यांनी मोठ्या कष्टानं आपल्या कुटुंबियांसाठी सुखाचे दिवस आणले.
advertisement
आज त्यांनी तब्बल 80 लाख रुपयांचा बंगला बांधलाय आणि त्यांचं ट्रॅक्टर प्रेम एवढं की, या बंगल्यावर क्रेनच्या सहाय्याने त्यांनी खराखुरा ट्रॅक्टर ठेवला आहे. हा ट्रॅक्टर आता लोक बघतच बसतात. तर, भिलारे दररोज सकाळी 15 मिनिटं हा ट्रॅक्टर सुरू करतात. त्याची पूजा करतात आणि मगच पुढच्या कामाला सुरूवात करतात. आता त्यांच्या गॅरेजमध्ये 8 कामगार आहेत. शिवाय महिन्याकाठी त्यांची जवळपास दीड लाख रुपयांची उलाढाल होते. ज्या कामाच्या जोरावर त्यांना ऐश्वर्य प्राप्त झालं त्या ट्रॅक्टरला त्यांनी आपल्या लाखोंच्या घरात सर्वात टॉपचं स्थान दिलंय हे उल्लेखनीय आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
July 22, 2024 8:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
तब्बल 80 लाखांचा बंगला बांधला, त्यावर ठेवली अशी गोष्ट की, बघणारे राहतात बघतच!