Dhule news : काँग्रेसकडून मिळाली मोठी जबाबदारी अन् दुसऱ्याच दिवशी नेत्याच्या सूतगिरणीवर तपास यंत्रणेचा छापा, धुळ्यात उडाली खळबळ
- Published by:sachin Salve
Last Updated:
काँग्रेस पक्षाने विदर्भातील मतदार संघाची जबाबदारी ही आमदार कुणाल पाटील यांना सोपवली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यंत्रणांनी छापा टाकत चौकशी सुरू केली आहे.
धुळे, 30 सप्टेंबर : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कारखान्याला नोटीस देण्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीवर छापा टाकण्यात आला आहे. नेमक्या कुठल्या यंत्रणेनं आणि का हा छापा टाकलेला आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. नाशिक जिल्ह्यातील पोलिसांच्या सुरक्षेते खाली ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणांमध्ये नाशिक आणि पुणे येथून पथक दाखल चौकशीसाठी पथक दाखल झाल्याची माहिती आहे.
advertisement
आमदार कुणाल पाटील यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनाही नेमक्या कुठल्या विभागाकडून ही कारवाई केली जात आहे? याची माहिती नाही. कुठल्या विभागाकडून काय कारवाई केली जात आहे? याची माहिती मिळाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देऊ, असं आमदार कुणाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
मात्र या कारवाईमागे काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेल्या जबाबदारी असल्याचं चर्चा रंगली आहे. काँग्रेस पक्षाने विदर्भातील मतदार संघाची जबाबदारी ही आमदार कुणाल पाटील यांना सोपवली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यंत्रणांनी छापा टाकत चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. संस्थेचा आर्थिक ताळेबंद तपासण्यात आला असून, त्यामध्ये क दर्जा प्राप्त झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
Location :
Dhule,Maharashtra
First Published :
September 30, 2023 2:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhule news : काँग्रेसकडून मिळाली मोठी जबाबदारी अन् दुसऱ्याच दिवशी नेत्याच्या सूतगिरणीवर तपास यंत्रणेचा छापा, धुळ्यात उडाली खळबळ