Budget 2026: बजेट सादर करण्यासाठी दही खाऊन बाहेर पडल्या निर्मला सीतारामण; त्यापाठीमागील धार्मिक कारण?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
budget 2026 :अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना दही भरवून रवाना केले. तुम्हाला प्रश्न पडला असेल की दहीच का? दह्याला धार्मिक, सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मंदिरांमधील नैवेद्यात, सणासुदीला किंवा...
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र यावेळी त्यांची सुरुवात एका वेगळ्या अंदाजात झाली. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना दही भरवून रवाना केले. तुम्हाला प्रश्न पडला असेल की दहीच का? दह्याला धार्मिक, सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मंदिरांमधील नैवेद्यात, सणासुदीला किंवा घरातील कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी दही नेहमीच शुभ आणि समृद्धीचे प्रतीक राहिले आहे. बजेट सादर करायला निघण्यापूर्वी अर्थमंत्र्यांचे दही खाणे म्हणजे प्रतिकात्मक नसून आपल्या सांस्कृतिक रीतिरिवाजांना संसदेच्या व्यासपीठाशी जोडण्याचा एक अनोखा मार्ग आहे.
दही आणि भारतीय परंपरा - दह्याचा उल्लेख वेदात आणि पुराणातही आढळतो. दही पवित्र मानले जाते, घरातील लक्ष्मीचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी दही खाण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. गोड दही खाऊन कामाला सुरुवात केल्यास त्या कामाचे शुभ फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. सणांमध्ये दह्याचा वापर सर्रास होतो. आपल्याकडे कोणत्याही महत्त्वाच्या कामाला, मुलाखतीला किंवा प्रवासाला जाण्यापूर्वी दही साखर खाणे हे यश आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. दही हे गणपती आणि लक्ष्मीला प्रिय असून ज्योतिषशास्त्रात दह्याचा संबंध चंद्राशी जोडला गेला आहे, तो मानसिक शांती आणि शीतलता प्रदान करतो. पूजा आणि विशेष प्रसंगी दह्याचा समावेश पंचामृतात केला जातो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन मन शांत राहते, असे मानले जाते.
advertisement
आरोग्य आणि दही - दही आध्यात्मिकच नाही तर शारीरिक लाभही देते. यात प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. दररोज सकाळी एक वाटी दही खाल्ल्याने पचन सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. अर्थमंत्र्यांसारख्या व्यग्र दिनक्रम असलेल्या व्यक्तीसाठी हे आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरते.
advertisement
#WATCH | President Droupadi Murmu feeds Union Finance Minister Nirmala Sitharaman the customary 'dahi-cheeni' (curd and sugar) ahead of her ninth consecutive Union Budget presentation. pic.twitter.com/WouiznFEMr
— ANI (@ANI) February 1, 2026
निर्मला सीतारामन यांच्या या कृतीने केवळ संसदेतच नाही तर सोशल मीडियावरही मोठी चर्चा घडवून आणली आहे. परंपरा आणि आधुनिक राजकारण एकाच वेळी चालू शकते हे यातून दिसून येते. देशासाठी आर्थिक निर्णय जितके महत्त्वाचे आहेत तितकाच आपल्या रीतिरिवाजांचा आणि सांस्कृतिक चिन्हांचा आदर करणे देखील महत्त्वाचे आहे. दह्याचे महत्त्व अन्नापुरते मर्यादित नसून ते आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपला विचार दर्शवते. अर्थसंकल्पापूर्वी दही खाणे हे एक छोटे पण अर्थपूर्ण पाऊल आहे जे समाज, आरोग्य आणि परंपरा यांना एकत्र जोडण्यास मदत करते..
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 11:47 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Budget 2026: बजेट सादर करण्यासाठी दही खाऊन बाहेर पडल्या निर्मला सीतारामण; त्यापाठीमागील धार्मिक कारण?










