अमरीश पटेल यांच्याकडून स्वागत, शरद पवार म्हणतात, स्वागताला तुम्ही कसे? भाईंचं उत्तर ऐकण्यासारखं!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sharad Pawar Dhule Daura : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर विमानतळावरती आगमन झाले. रविवारी सकाळी ते शिंदखेडा येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
धुळे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार आज (रविवारी) धुळे दौऱ्यावर आहेत. शिरपूर विमानतळावर त्यांच्या स्वागताला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी शिरपूर नगरीचे भाजपचे आमदार अमरीश पटेल यांनीही पवारांचे स्वागत केले. स्वागतावेळी उभय नेत्यांमध्ये मिश्किल संवाद झाला पण आजच्या सूड भावनेने पेटलेल्या राजकारणात दोघांमधला संवाद विशेषार्थाने महत्त्वाचा ठरला.
खासदार शरद पवार यांचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर विमानतळावरती आगमन झाले. रविवारी सकाळी ते शिंदखेडा येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या शेतकरी मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकरी मेळाव्यानंतर पवार भजनी मंडळांना साहित्यचे वाटपही करणार आहेत.
advertisement
अमरीश पटेल यांच्याकडून स्वागत, शरद पवार म्हणतात, तुम्ही कसं काय स्वागत केलं?
शरद पवार हे सकाळी नऊ वाजता शिरपूर विमानतळावर आल्याने अनेकांची धावपळ उडाली. शिरपूर विमानतळावर शरद पवार यांचे स्वागत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पवारांचे स्वागत करण्यासाठी भाजप आमदार अमरीश पटेल यांनीही उपस्थिती लावली. अमरीशभाईंच्या उपस्थितीने अनेकांचे डोळे विस्फारले होते. शरद पवार यांनी हाच धागा पकडून तुम्ही माझ्या स्वागताला कसे काय? असे मिश्किलपणे विचारले. त्यावर 'पक्ष बिक्ष काय असतो हो साहेब...' असे उत्तर देऊन 'राजकारणापलीकडची नाती आणि सौहार्द' जपण्याचा अप्रत्यक्ष संदेशच अमरीश पटेल यांनी दिला. उभय नेत्यांमधल्या संवादाची चर्चा धुळे जिल्ह्यासह राज्यभर होते आहे.
advertisement
पवार वेळेवर, आयोजकांची तारांबळ
शरद पवार यांचे शिंदखेडा येथे अगदी वेळेवर आगमन झाले. शेकरी मेळावा सकाळी १० वाजता होता. त्यानुसार पवार बरोबर १० वाजता शिंदखेड्यात पोहोचले. कार्यकर्त्यांनी पवारांचे अतिशय धुमधडाक्यात स्वागत केले. त्यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करून पवारांचे वेलकम करण्यात आले. शरद पवार वेळेवर कार्यक्रमाला हजर उपस्थित झाल्यामुळे आयोजकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी कार्यकर्त्यांना जमविण्याचे गणित पवारांच्या लवकर आगमनामुळे चुकले. आयोजकांना धावपळ करीत कार्यकर्त्यांची जमवाजमव करावी लागली.
Location :
Dhule,Maharashtra
First Published :
September 15, 2024 10:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धुळे/
अमरीश पटेल यांच्याकडून स्वागत, शरद पवार म्हणतात, स्वागताला तुम्ही कसे? भाईंचं उत्तर ऐकण्यासारखं!