भाजपमध्ये भडका उडाला, बावनकुळेंसमोर नवनीत राणा-खासदार बोंडेमध्ये तू तू मैं मैं

Last Updated:

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहीर सभेत नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला.

नवनीत राणा-अनिल बोंडे-चंद्रशेखर बावनकुळे
नवनीत राणा-अनिल बोंडे-चंद्रशेखर बावनकुळे
संजय शेंडे, प्रतिनिधी, अमरावती : रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची आणि भारतीय जनता पक्षाची युती असली तरीही, राणा दाम्पत्याने अमरावती महानगरपालिकेच्या रणांगणात स्वत:चे ३४ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. नवनीत राणा या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत असल्याने खासदार अनिल बोंडे यांनी आज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहीर सभेत नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला.
स्टेजवरच्या सर्व उमेदवारांनी फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठीच मत मागावी, माझा भाऊ जरी शिवसेनेमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये असता तरी मी केवळ कमळासाठीच मतदान मागितले असते, असा टोला खासदार बोंडे यांनी नवनीत राणा यांना लगावला.

नवनीत राणा-खासदार बोंडेमध्ये तू तू मैं मैं

त्यावर नवनीत राणा यांनी देखील आपल्या भाषणातून खासदार अनिल बोंडे यांना पालकमंत्र्यांसमोरच सुनावले. अनिल बोंडे यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस यांचा प्रचार न केल्याचा ठपका होता. हाच मुद्दा पकडून त्यांनी टोलेबाजी केली. अनिल बोंडे भाऊ मी देखील मोर्शी फिरून आली आहे. मोर्शीमध्ये माझी सभा झाली आहे. कोणालाही बोलण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी बोंडेंना चिमटे काढले. बावनकुळेंसमोर नवनीत राणा यांनी अनिल बोंडे यांना सुनावल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याची चर्चा आहे.
advertisement

भगव्यासोबत बेइमानी करणाऱ्याला सोडणार नाही- नवनीत राणा

लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार केला होता. तर भाजपचे महापालिकेचे उमेदवार तुषार भारतीय यांनी रवी राणा यांच्या विरोधात बडनेरामध्ये बंडखोरी केली होती. अमरावतीची एक जागा नाही आली तरी हरकत नाही असे त्यावेळी काही भाजप नेते सांगत होते. त्याचाही नवनीत राणा यांनी खरपूस समाचार घेतला. यामुळे आता भाजपमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध इतर भाजप नेते असे चित्र निर्माण झाले आहे. हाच धागा पकडून भगव्यासोबत बेइमानी करणाऱ्याला सोडणार नाही, असे राणा म्हणाल्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपमध्ये भडका उडाला, बावनकुळेंसमोर नवनीत राणा-खासदार बोंडेमध्ये तू तू मैं मैं
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement