आजीच्या तोंडावर सत्तूरने वार करून संपवलं, पोलिसांनी पकडल्यावरही नातू होता हसत, बीडमधील घटना
- Published by:Sachin S
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
नशेच्या अवस्थेत घरी आला आणि आजीकडे पैशाची मागणी करू लागला. आजीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या..
बीड : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या 20 वर्षीय विकृत मुलाने आई-बापासह घरातील सदस्यांवर सत्तूरने वार केल्याची घटना घडली आहे. या प्राणघातक हल्ल्यात आजीचा मृत्यू झाला आहे. तर आई-वडील गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी शहरातील तलाब कट्टा फुलेनगर परिसरात शनिवारी सायंकाळी ६.३०वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तलाब कट्टा फुलेनगर परिसरातील कुरेशी कुटुंब राहतं. जुबेदा इब्राहिम कुरेशी या ८० वर्षीय वृद्धा घरी होत्या. त्यांचा नातू आरबाज रमजान कुरेशी(वय २० वर्षे) हा नशेच्या अवस्थेत घरी आला आणि आजीकडे पैशाची मागणी करू लागला. आजीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या आरबाजने हातातील सत्तूरने थेट त्यांच्या तोंडावर वार केला. या भयंकर हल्ल्यात आजी जागेवर कोसळली.
advertisement
त्याची आई समिना रमजान कुरेशी आणि वडील रमजान इब्राहिम कुरेशी तातडीने धावून आले, मात्र आरोपीने त्यांच्यावरही शस्त्राने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलं. त्यानंतर आरबाज सत्तूर हातात घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण स्थानिकांनी त्याला रोखून धरलं. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी धाव घेतं आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीकडील धारदार शस्त्र जप्त केलं आहे.
advertisement
वृद्धेवर उपचार उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर गंभीर जखमी आई-वडिलांवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेने संपूर्ण तलाब कट्टा परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आरोपी नातवावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
August 09, 2025 10:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजीच्या तोंडावर सत्तूरने वार करून संपवलं, पोलिसांनी पकडल्यावरही नातू होता हसत, बीडमधील घटना


