मुंबई: दसऱ्याच्या मुर्हुतावर राज्यात मेळाव्यांचा धुरळा उडणार आहे. विधानसभा निवडणुकींच्या आधीच्या मेळाव्यात नेते सोडणार टीकेचे बाण. दसऱ्याच्या मुर्हुतावर आझाद मैदानात शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. तर शिवाजी पार्कावर धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दसरा मेळाव्यांकडे राज्याचं लक्ष आहे. राज्यातील राजकीय घडामोडी आणि सगळे अपडेट्स एका क्लिकवर.
भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, मी आज भारावून गेलो, एका तपा नंतर मी दसरा मेळाव्यात आलोय. दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा कळली पाहिजे. भगवान गडाचा वर्धापन दिन तोच पुढे दसरा मेळावा. ही परंपरा मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवली. 12 वर्षाचा प्रारब्ध आता संपले, आम्ही दोघांनी तो भोगला. हा भक्ति आणि शक्तीचा दसरा मेळावा आहे.
पंकजाताई पराभूत झाल्या तेव्हा महाराष्ट्रातल्या तरुणांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या केल्या की दक्षिणेतल्या नेत्यांची आठवण येते. पण महाराष्ट्रातील या तरुणांना सांगणं आहे की भगवानबाबांनी शिकण्याचा मंत्र दिलाय. आत्महत्या करू नये अशी विनंती हाकेंनी केली.
भगवान भक्तीगडाचा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा सुंदर मिलाफ आहे. दसऱ्याला या गड्यावर मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातल्या उसतोड मजुरांच्या मनात शक्ती निर्माण करण्यासाठी विचारमंच दिला असं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.
मंचावरचे चेहरे बदलतील पण तुमचे जे खाली बसलेल्यांचे चेहरे आहेत ते कायम राहतील. हा दसरा मेळाव्याचा खरा चेहरा आहे आणि तो कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. कानाकोपऱ्यातून इथं आलेल्या लोकांचे मी आभार व्यक्त करते असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं. दहा वर्षे सेवेची संधी दिलीत, तुम्ही मला जीव लावलात अशा भावना माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केल्या.
आजचा मेळावा मुंडे साहेबांच्या लेकीचा आणि बहुजनांच्या एकीचा आहे. हा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. आपलं ध्येय सत्ता नाही तर सर्वसामान्य जनतेची सेवा आहे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पंकजा ताईंनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असं प्रीतम मुंडे यांनी यावेळी म्हटलं.
भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांच्या हस्ते संत भगवान बाबांची आरती करण्यात आली. भगवान गडावरील दसरा मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, माजी खासदार सुजय विखे हे उपस्थित आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्याबद्दल बोलताना म्हटलं की, दसऱ्या दिवशी हेच मागणं आहे की या पुढचा दसरा मेळावा ऐकताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नावापुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा असे लिहून यावं.
नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमात बांगलादेशातील हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केलीय. निवडणूक आली की हिंदूंचा पुळका मोहन भागवत यांना येतो. हिंदुत्ववादी हे हिंदू नाही. हिंदुत्ववादी यांचा मातीशी संबंध नाही. विशिष्ट धर्मचा माणूस सापडला तर त्याला सगळ्यात आधी भाजप बदनाम करतं. भेदभाव करण्याची शिकवण रेशीमबाग मधून आली असंही ते म्हणाले.
देशात एकच मेळावा होतो जिथं विचारांचं सोनं लुटलं जातं तो म्हणजे शिवतीर्थावरील सेनेचा दुसरा मेळावा. एक मेळावा आरएएसचा होतो आणि मुंबईमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा होत आहे. आता मेळाव्यांची लाट आलीय, डुप्लिकेट लोकही मेळावे करतात.
– सृष्टी राहणार की नाही यावर चर्चा केली जात आहे
– ऋतू मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे
– पर्यवरणाच्या बाबतीत अर्ध्या माहितीच्या आधारावर चालले जात आहे
– जगाच्या मागे चालत गेलो त्यामुळे जमीन नापीक होत आहे, जंगल कापले जात आहे, नदी आटत चालल्या आहे
– विचार बदलून पर्यावरण प्रति कृतड्यात राखून पुढे जावं लागेल
– 10 हजार वर्षे जैविक शेती होत असताना अजूनही जमीन सुपीक आहे
– रासायनिक खत वापरल्याने 200 वर्षात जमीन बंजार झाली
– पाणी वाचवणे, प्लास्टिकचा वापर कमी , वृक्षारोपण केलं पाहिजे, या तीन गोष्टींचे पालन केले पाहिजे
– वृक्ष रोपण करताना देशी वृक्ष लावा काही वृक्ष विदेशातून आणले गेले त्यावर पक्षी बसत नाही, वायू विषारी आहे अशे वृक्ष कापायला सरकार परवानगी देत आहे
– देशात सांस्कृतिक मूल्य तुडविले जात आहे त्यासाठी वेळीच सावध व्हावं लागेल
– लहान मोठ्यांच्या हाती मोबाईल आहे, घरी काय पाहायचं काय पाहू नये यावर नियंत्रन नाही
– विधी व्यवस्थेत यावर कायदा बनवण्याची आवश्यक ता आहे
– या बाबत कठोरता नसल्याने युवा पिढी नशेच्या गर्तेत जातोय, जो नशा करणार नाही त्याला मागास समजलं जातंय
– कोलकातामध्ये जे रुग्णालयात घडलं ते लज्जास्पद होत, ही एक घटना नाही
– अश्या घटना घडू नये या करिता सुरक्षा दिली पाहिजे
– दोषींना अपराध झाल्यावर संरक्षण देण्यात आलं*
– शेजारील बांगलादेश मध्ये काय झालं त्याचे तत्कालीन कारण आहे,पण त्या कारणांनी इतके उत्पात होत नाही
– बंगलादेश मध्ये हिंदु वर वारंवार अत्याचार होत आहे, पहिल्यांदा हिंदू आपल्या रक्षणासाठी एकत्रित आला
– बांगलादेश मध्ये हिंदूंना भारत सरकारच्या मदतीची गरज आहे
– हिंदू दुर्बल होईल तर अत्याचार होणार
– बांगलादेश मध्ये अशी चर्चा आहे की भारत पासून त्यांना भीती असून पाकिस्तान आपला खरा मित्र आहे,
– ज्या बांगलादेश ला भारताने पूर्ण मदत केली तिथे अश्या चर्चा होतात त्या कोणत्या देशाच्या फायद्याच्या आहेत
– भारत सामर्थ्यवान झाला तर त्याचा धोका वाटतो