Eknath Shinde : 'नाईलाजाने मग निर्णय घ्यावा लागेल!’, शिंदेंचा थेट इशारा, आमदारांमध्ये खळबळ
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आमदारांना कानपिचक्या दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
मुंबई: मागील काही दिवसात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चांगलेच चर्चेत आले आहेत. मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड हे मागील काही दिवसांत चर्चेत आल्याने विरोधकांनी शिंदे गटावर निशाणा साधला. तर, दुसरीकडे महायुतीमध्येही शिंदे गटाच्या मंत्र्यांना निधीत डावललं जात असल्याची चर्चा सुरू आहेत. अशातच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आमदारांना कानपिचक्या दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आपल्या पक्षाच्या आमदारांची, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सौम्य भाषेत खडे बोल सुनावले असल्याचे सांगण्यात येते. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, कमी कालावधीत अधिक यश मिळाल्याने बदनामीचे डाव आखले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या, पुढील काळ कसोटीचा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मी प्रमुखासारखे नव्हे, तर कार्यकर्त्यासारखे वागतो. त्यामुळे तुम्ही पण डोक्यात हवा जाऊ देऊ नका आणि सर्वसामान्यांची कामे करा, असे आवाहनही शिंदे यांनी या बैठकीत केले असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
advertisement
तसा निर्णय घेण्यास मला भाग पाडू नका....
एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना वागणुकीवरून सल्ला वजा इशारा देताना म्हटले की, आपल्या कुटुंबावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही. परंतु, मला कारवाई करायला भाग पडणार नाही, असेच काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी रागावत नाही. मी प्रमुखासारखे वागत नाही. कार्यकर्त्यासारखे वागतो. त्यामुळे तुम्हीही तसेच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका. आपण कार्यकर्ता आहोत, असं समजून कामं करा असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
advertisement
तर, घरी पाठवणार...
एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सूचक इशारा दिला, त्यांनी म्हटले की, तुम्ही सगळी माझी माणसे आहात. आपले कुटुंब एक आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. त्यामुळे तुम्ही चुकीच्या गोष्टींवर ऊर्जा वाया घालवू नका. कमी बोला आणि जास्त काम करा. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावे लागले आहे, हे लक्षात ठेवा, असं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 9:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : 'नाईलाजाने मग निर्णय घ्यावा लागेल!’, शिंदेंचा थेट इशारा, आमदारांमध्ये खळबळ