advertisement

Eknath Shinde: खासदारांची लॉबिंग अन् एकनाथ शिंदेंचा संताप! दिल्लीतील शिंदे गटाच्या बैठकीत 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Last Updated:

Eknath Shinde : विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

खासदारांची लॉबिंग अन् एकनाथ शिंदेंचा संताप! दिल्लीतील शिंदे गटाच्या बैठकीत 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
खासदारांची लॉबिंग अन् एकनाथ शिंदेंचा संताप! दिल्लीतील शिंदे गटाच्या बैठकीत 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
मुंबई: राज्यातील विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मंगळवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल दीड तास प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीत राज्याच्या विकासकामांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, या दिल्लीवारीमागे सत्तासंघर्ष आणि पक्षीय शिस्तीचे मोठे संकेत दडलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे खासदारांची कानउघाडणी केली असल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधानांसोबत 'पॉझिटिव्ह' चर्चा

मंगळवारी दुपारी संसदेच्या आवारात पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात सकारात्मक बैठक पार पडली. "राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा झाली आहे," असे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील सध्याची राजकीय स्थिती यावरही विचारविनिमय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. "दिल्लीत आल्यावर माझ्यावर कोणी कितीही टीका केली, तरी राज्याच्या हितासाठी मला जे हवे आहे, ते मी करतच राहणार," असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
advertisement

खासदारांची कानउघाडणी

दिल्लीत पोहोचल्यानंतर सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या खासदारांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही खासदारांच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रातील आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात स्थान मिळवण्यासाठी काही खासदारांची धडपड सुरू असल्याची चर्चा होती. यावर भाष्य करताना शिंदेंनी संबंधित खासदारांना स्पष्ट शब्दांत चपराक लगावली. "आधी जमिनीवर काम करून दाखवा, मगच पदाची अपेक्षा ठेवा," अशा शब्दांत त्यांनी खासदारांना ठणकावले. पक्षविस्तार आणि लोकहिताच्या कामांकडे दुर्लक्ष करून केवळ पदासाठी लॉबिंग करणाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी खडे बोल सुनावले आहेत.
advertisement

सर्वोच्च न्यायालयातील लढाई आणि रणनीती

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर सल्ल्यासाठीही ही दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट झाली नाही, ज्यामुळे या दौऱ्याचा मुख्य उद्देश पक्षीय शिस्त आणि थेट पंतप्रधान स्तरावरील समन्वय असल्याचे दिसून येते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde: खासदारांची लॉबिंग अन् एकनाथ शिंदेंचा संताप! दिल्लीतील शिंदे गटाच्या बैठकीत 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement