श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत, म्हणाले महाराष्ट्र हितासाठी...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्याकडे रवाना झाले आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून महायुतीच्या सत्तावाटपाच्या विविध मुद्द्यांवरील प्रश्नांना उत्तरे दिली.
सातारा (दरे गाव) : सत्तावाटपाची दिल्लीतील बैठक आटपून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडक साताऱ्याच्या मूळ गावी आरामासाठी गेल्याने राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली. भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्रिपद मित्रपक्षांना न देण्याची स्पष्ट भूमिका पक्षनेतृत्वाने शिंदे यांना कळविल्याने ते नाराज असल्याचे बोलले जाते. याच नाराजीतून दिल्लीची बैठक आटपून ते साताऱ्याला विश्रांती घेण्यासाठी गेले. दोन दिवस दरे गावी मुक्काम ठोकल्यानंतर त्यांनी रविवारी माध्यमांनी संवाद साधला.
यावेळी माध्यमांनी शिंदे यांना महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, शिवसेनेने गृहमंत्रिपदाची केलेली मागणी, विधान परिषदेच्या सभापतीपदाची केलेली मागणी, शिवसेनेची आगामी काळातील वाटचाल आदी विषयांवर प्रश्न विचारले. विशेषत: श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना एकनाथ शिंदे यांना त्याविषयी विचारले गेले.
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?
त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, चर्चा अजूनही सुरू आहेत. कोणत्याही चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी एक बैठक झालेली आहे. दुसऱ्या बैठकीत साधक बाधक चर्चा होऊन महाराष्ट्र हिताचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. एकंदर श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या वृ्त्ताचे त्यांनी अजिबात खंडन केले नसल्याने त्या चर्चांमध्ये तथ्य असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.
advertisement
गृहमंत्रालयासाठी आग्रही, मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे अजूनही आशादायी
यावेळी गृहखात्याच्या मागणीबाबतही त्यांना विचारले. ते म्हणाले, भाजपसोबत आमची चर्चा सुरू आहे, चर्चा होत राहील. चर्चेतून बऱ्याचशा गोष्टी सुटतील. एकंदर गृहमंत्रालयासाठी आग्रही असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. तसेच माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या आणि जिंकल्या असे वारंवार शिंदे सांगत असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी ते अजूनही आशादायी असल्याचे दिसते.
अंतिम क्षणापर्यंत सत्तावाटपाच्या वाटाघाटी सुरू राहतील, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
view commentsमहायुतीत चर्चा सुरू राहिल, चर्चेतून मार्ग निघेल, असे सांगत भारतीय जनता पक्षासोबत अंतिम क्षणापर्यंत सत्तावाटपाच्या वाटाघाटी सुरू राहतील, असे स्पष्ट संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
December 01, 2024 4:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत, म्हणाले महाराष्ट्र हितासाठी...


