Eknath Shinde : अधिवेशनाच्या धामधुमीत एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी? उदय सामंताच्या उत्तराने सस्पेन्स वाढवला

Last Updated:

Eknath Shinde : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत हजेरी लावली आहे.

अधिवेशनाच्या धामधुमीत एकनाथ शिंदेंची पु्न्हा दिल्लीवारी? उदय सामंताच्या उत्तराने सस्पेन्स वाढवला
अधिवेशनाच्या धामधुमीत एकनाथ शिंदेंची पु्न्हा दिल्लीवारी? उदय सामंताच्या उत्तराने सस्पेन्स वाढवला
मुंबई: राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत हजेरी लावली असल्याचे वृत्त समोर आले आहे. या अनपेक्षित दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. दिल्लीमध्ये शिंदे यांनी भाजपमधील बड्या नेत्यांशी गुप्त भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.
विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या कालावधीत हा दौरा झाल्यामुळे अनेकांची भुवया उंचावल्या आहेत.शिंदे यांच्या या अचानक दिल्लीतल्या हालचालींमुळे राजकीय भाकितं जोर धरू लागली आहेत. राज्यात पुन्हा काही मोठं राजकीय समीकरण तयार होणार का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. दरम्यान नियोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्वीचे कर्नाक पूल आणि आता सिंदूर पूलाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधिमंडळात अधिवेशनासाठी उपस्थित होते.
advertisement

उदय सामंतांच्या उत्तराने सस्पेन्स वाढवला...

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीवारी केल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उत्तराने सस्पेन्स वाढवला आहे. आज माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे हे दिल्लीत होते हे मला तुमच्या कडून समजले असल्याचे सांगितले.
उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचे वृत्त थेट फेटाळले नाही.  मुंबई आणि राज्याच्या विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी आमची आहे. त्यातून ते दिल्लीला गेले असतील असेही सामंत यांनी म्हटले. सामंत यांच्या उत्तराने राज्यात नेमकं काय सुरू आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : अधिवेशनाच्या धामधुमीत एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी? उदय सामंताच्या उत्तराने सस्पेन्स वाढवला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement