मतदानाची टक्केवारी कशी वाढली? ती ७६ लाख मतं कुठून आली? निवडणूक आयोगाने सगळं सांगितलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
ECI Rajiv Kumar Press Conference: निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या विविध आरोपांना उत्तरे दिली.
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याचा आरोप करून तब्बल ७६ लाख मतांची वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा आक्षेप काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून नोंदवला होता. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या विविध आरोपांना उत्तरे दिली.
देशाची लोकसभा तसेच महाराष्ट्र आणि हरियाणा यांसारख्या महत्त्वाच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याचीच घोषणा निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान होईल तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी काँग्रेस पक्षाच्या आरोपांना त्यांनी उत्तरे दिली.
advertisement
मतदानाची टक्केवारी कशी वाढली?
मतदानाची वेळ जरी सहा वाजेपर्यंत असली रांगा मोठ्या असल्याने कायद्याप्रमाणे विहित वेळेत आलेल्यांचे मतदान नोंदवून घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. त्यानुसार पात ते सहा या वेळेत आलेल्या मतदारांचे मतदान आम्ही नोंदवून घेतले. आपण लाईनमध्ये उभा राहा, तुमचं मतदान नोंदवलं जाईल, अशी खात्री निवडणूक अधिकारी वेळोवेळी मतदारांना देतात. त्यानंतर त्यांचे मतदान नोंदवून घेतले घेऊन त्यांना १७ सी फॉर्म दिले जातात.अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे साडेपाच नंतर मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना स्लीप दिली जाते, असे स्पष्टीकरण वाढीव मतदानाच्या काँग्रेसच्या आक्षेपाला राजीव कुमार यांनी दिले.
advertisement
संध्याकाळी सहा वाजता मतदानाची अचूक टक्केवारी सांगणे निव्वळ अशक्य आहे असे सांगत यंत्रणेने व्यवस्थित काम केले आहे पण वैयक्तिक कुणाकडून चूक झाली असेल तर सांगा, आम्ही कारवाई करू, अशी ग्वाही देत एक लाख बूथ महाराष्ट्रात होते, प्रत्येक बूथवर चार एजंट जरी पकडले तरी चार लाख सी फॉर्म उपलब्ध आहेत, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
advertisement
सहा ते अकरादरम्यान आठ टक्के मतदान वाढविल्याचा आरोप आमच्यावर केला जात आहे. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी साऱ्या मशिनला घेऊन डिपॉसिट केंद्रावर जातात. सगळेच निवडणूक निर्णय अधिकारी सात-साडे सात पर्यंत डिपॉझिट केंद्रावर पोहोचत नाही. कुणाकुणाला वेळ लागतो. तिथे मतदानाची अचूक टक्केवारी काढून शेवटी प्रसिद्धीपत्रक काढले जाते. कालच प्रसिद्धीपत्रक का काढले नाही, असा प्रश्न दुसऱ्या दिवशी विचारू नये म्हणून मतदान संपताच आम्ही प्रक्रिया पूर्ण करून आणि अंतिम टक्केवारी काढून प्रसिद्धीपत्रक जारी केले, असे राजीव कुमार यांनी सांगितले
advertisement
सहा वाजताच आकडेवारी का सांगत नाही, राजीव कुमार म्हणाले...
सहा वाजताच आकडेवारी का सांगत नाही या विरोधकांच्या आक्षेपाला उत्तर देताना राजीव कुमार म्हणाले, मतदान प्रक्रिया आटपायची, मतदान केंद्र बंद करायचे की ईव्हीएम सील करायचे, सहा वाजता काय काय करायचे? असा उलटसवाल त्यांनी केला.
काँग्रेसचा आक्षेप काय होता?
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा आहे. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर मतदानावर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवून केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 3:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतदानाची टक्केवारी कशी वाढली? ती ७६ लाख मतं कुठून आली? निवडणूक आयोगाने सगळं सांगितलं


