ठाण्याच्या लावणी सम्राटाचे 'लावणी'वर संशोधन, गैरसमज दूर करण्यासाठी उचललं मोठं पाऊल
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
महाराष्ट्राच्या मातीत जन्म झालेल्या या लावणीचा जिवंतपणा टिकवून ठेवण्यासाठी 2006 साली प्राध्यापक महेश थोरात प्रत्यक्षात लावणीत उतरले. लावणीबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी थोरात यांनी लावणी विषयावर संशोधन अभ्यास सुरू केला.
महाराष्ट्राच्या मातीत जन्म झालेल्या या लावणीचा जिवंतपणा टिकवून ठेवण्यासाठी 2006 साली पेशाने प्राध्यापक असलेले महेश थोरात प्रत्यक्षात लावणीत उतरले. लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय यांच्या संयोगातून सादर केला जाणारा एक कलाविष्कार म्हणजे लावणी होय.
लावणी बद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी थोरात यांनी लावणी या विषयावर संशोधन अभ्यास सुरू केला आहे. आजच्या घडीला लोकांसमोर लावणी प्रत्यक्षात सादर करणे हे एक स्त्रीला ही न परवडण्याइतके असले तरी एक पुरुष म्हणून लावणीत प्रत्यक्षात उतरणे आणि लावणी सादर करणे हे ही खुप कठीण आहे. थोरात यांनी लावणीत केलेली वेशभूषा ही एक सुंदर स्त्री ला ही मागे टाकण्या सारखी आहे. महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लावणी होय.
advertisement
लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित शृंगार श्रेणीतील लावण्या या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख लोकनाट्य फडांनी सादर करून लोकप्रियता मिळवली. लावणी ही पारंपारिक गाणे आणि नृत्य यांचे संयोजन आहे. लावणीमध्ये ढोलकी आणि तुणतुणे या वाद्याच्या साथीने सादर केली जाते. लावणी ही ढोलकीच्या शक्तिशाली लयीसाठी प्रख्यात आहे. मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी लावणीचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य प्रदेशात लावणी सादर करणाऱ्या स्त्रिया या नऊवारी साड्या परिधान करून लावणी म्हणतात. ही गाणी खटकेबाज, प्रासयुक्त, गेय असतात. तेराव्या शतकापासून महाराष्ट्रात लावणी अस्तित्वात असली तरी पेशवाईत तिला वैभव प्राप्त झाले.
advertisement
लावणीला अलिकडे चांगली प्रतिष्ठा मिळाली आहे. तिचे स्वरुपही बदलले आहे. भारतात विविध ठिकाणी विविध नृत्यशैली अस्तित्वात आहेत. लावणी हा नृत्यप्रकार मुख्यतः महाराष्ट्र या राज्यात बघायला मिळतो.ही च लावणी आज कुठेतरी टाइमपास म्हणून समजत असली तरी लावणी भविष्यात टिकवून ठेवण्यासाठी थोरात यांनी प्रत्यक्षात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. लावणीतूनच महाराष्ट्राची भूमी ओळखली जात असल्याने तिला सांभाळून ठेवण्याची गरज आहे आणि आज महेश थोरात यांनी लावणीत उतरवून स्वतः लावणी या विषयावर संशोधनाचे काम करत आहेत. त्यांच्या या उंच भरारीला यश मिळो आणि एका पुरुषाचा आदर्श प्रत्येक पुरुषात लावणीने घ्यावा. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या लावणीला नव्याने दिशा मिळावी.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
October 11, 2025 4:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाण्याच्या लावणी सम्राटाचे 'लावणी'वर संशोधन, गैरसमज दूर करण्यासाठी उचललं मोठं पाऊल