Mohol News: रक्ताचं पाणी करून बाग फुलवली पण, खर्चही निघाला नाही; बागेवर नांगर फिरविण्याची शेतकऱ्यावर वेळ

Last Updated:

पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या पपईच्या बागेवर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी नागेश गायकवाड यांनी नांगर फिरवला आहे.

+
कष्टाने

कष्टाने लागवड केलेल्या पपईच्या बागेवर शेतकऱ्यांनी फिरवला नांगर, 6 ते 7 लाखांचं न

सोलापूर: पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या पपईच्या बागेवर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी नागेश गायकवाड यांनी नांगर फिरवला आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पपईच्या बागेवर रोग पडल्याने बागेवर नांगर फिरवण्याची वेळ नागेश यांच्यावर आली आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी नागेश गायकवाड यांनी लोकल 18 बोलताना दिली.
मोहोळ तालुक्यातील शेतकरी नागेश गायकवाड यांनी तीन एकरात पपईची लागवड केली होती. पपईच्या बागेचा एकही रुपया हातात न घेता संपूर्ण बागेवर नागेश यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगर फिरवला आहे. अतिवृष्टीमुळे पपईच्या बागेवर रोग पडल्याने अर्ध्याच्या वर पपईची झाडे जळून गेली तर काहींना फळधारणा होत नव्हती यामुळे संपूर्ण बागेवर नांगर फिरवावा लागला.
advertisement
पपईच्या बागेच्या लागवडीसाठी नागेश गायकवाड यांना दोन ते अडीच लाख रुपये पर्यंत खर्च आला होता. नागेश यांची जवळपास सहा ते सात महिन्याची ही बाग होती. पपईच्या बागेची लागवड केल्यावर त्यावर कोणताही रोग पडू नये, पपईची झाडे जळून जाऊ नये करपा रोग होऊ नये, यासाठी नागेश यांनी पोटच्या मुलाप्रमाणे ही बाग जपली होती. परंतु अतिवृष्टीमुळे संपूर्ण बाग जळून गेली आहे.
advertisement
पपईची बाग अतिवृष्टीमुळे जळाली नसती, तर नागेश गायकवाड यांना या बागेपासून लागवडीचा खर्च वजा करून सहा ते सात लाखाचा उत्पन्न मिळणार होता. पपईच्या बागेवर पाहिलेल्या सर्व स्वप्नावर नागेशने नांगर फिरवला आहे. शासनाने बळीराजाकडे लक्ष देऊन योग्य ती मदत करावी असे आवाहन शेतकरी नागेश गायकवाड यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mohol News: रक्ताचं पाणी करून बाग फुलवली पण, खर्चही निघाला नाही; बागेवर नांगर फिरविण्याची शेतकऱ्यावर वेळ
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement