Dharmendra First Wife : कोण आहे धर्मेंद्र यांची पहिली पत्नी? हॉस्पिटलमध्ये रडतानाचा व्हिडीओ झालेला व्हायरल

Last Updated:
Dharmendra First Wife : अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविषयी सगळेच जाणतात पण कोण आहे धर्मेंद्र यांची पहिली पत्नी? धर्मेंद्र रुग्णालयात अत्यवस्त अवस्थेत असताना त्यांना पाहून ढसाढसा रडल्या होत्या.
1/10
अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांच्या शेवटच्या काळात त्यांचं कुटुंबीय त्यांच्याबरोबर होतं. त्यांच्या दोन्ही पत्नींनी त्यांना या काळात मोठी साथ दिली. धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये असताना त्यांचा हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्यांची पहिली पत्नी ढसाढसा रडताना दिसली होती. कोण आहे धर्मेंद्र यांची पहिली पत्नी? दोघांची लव्ह स्टोरी 70 वर्ष जुनी आहे.

advertisement
2/10
 धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न 1954 साली पंजाबी असलेल्या प्रकाश कौर यांच्याशी केलं. त्यावेळी ते फक्त 19 वर्षांचे हेते.  धर्मेंद्र यांनी बॉलिवूडचा ग्लॅमरस पडदा निवडला पण त्यांची पत्नी प्रकार कौर मात्र नेहमीच पडद्यामागे राहिल्या.

3/10
प्रकाश कौर धर्मेंद्रच्या घरची लक्ष्मी आणि त्यांच्या चार मुलांची आई म्हणून राहिल्या. दोन्ही मुलगे स्टार नवरा त्या काळातील सर्वात देखणा हिरो होता, ज्याच्याभोवती कायम तरुणींचा गराडा राहिला आहे. हे सगळं प्रकार कौर यांनी त्यांच्या आयुष्यात शांतपणे सांभाळलं. 

4/10
पंजाबमधील फगवाडा येथील एका जाट शीख कुटुंबात जन्मलेले धर्मेंद्र सिंग देओल यांनी फिल्मफेअर टॅलेंट हंट जिंकला होता. त्याआधीच त्याचं प्रकाश कौरशी यांच्याशी अरेंज मॅरेज झालं होतं. 

5/10
 प्रकाश कौर त्या काळातील एक देखणी पंजाबी होती. साधेपणा, प्रतिष्ठा आणि संयम हे त्यांचे वैशिष्ट्य होते. धर्मेंद्र स्वतः म्हणाले होते,
प्रकाश कौर त्या काळातील एक देखणी पंजाबी होती. साधेपणा, प्रतिष्ठा आणि संयम हे त्यांचे वैशिष्ट्य होते. धर्मेंद्र स्वतः म्हणाले होते, "चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी माझे लग्न झाले होते. प्रकाश माझ्या आयुष्यातील पहिली आणि खरी नायिका आहे."
advertisement
6/10
धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुले झाली. दोन मुलगे, सनी देओल आणि बॉबी देओल आणि दोन मुली, अजिता आणि विजेता. सनी आणि बॉबी त्यांच्या वडिलांसारखे बॉलिवूड सुपरस्टार बनले. पण त्यांच्या मुली नेहमीच लाइम लाइटपासून दूर राहिल्या. 

7/10
1980मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाने देशभरात खळबळ उडाली. असं म्हणतात धर्मेंद्र यांनी या लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. ते प्रकाश यांना डिवोर्स देऊ इच्छित नव्हते.  या काळात प्रकाश कौर यांनी कधीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती.

8/10
हेमा मालिनी यांच्याशी लग्नानंतर एका मुलाखतीत बोलताना प्रकार कौर म्हणाल्या होत्या,
हेमा मालिनी यांच्याशी लग्नानंतर एका मुलाखतीत बोलताना प्रकार कौर म्हणाल्या होत्या, "धर्मेंद्र एक परिपूर्ण पती नाही पण ते एक चांगले वडील आहेत. हेमा जी खूप सुंदर आहेत. कोणताही पुरुष त्यांच्याकडे आकर्षित होईल."
advertisement
9/10
प्रकाश कौर यांनी त्यांची प्रतिष्ठा आणि प्रायव्हरी कायम जपली. त्या त्यांच्या मुलांशी आणि नातवंडांशी अत्यंत जवळ आहेत.  सनी देओल कायम त्याच्या आईबरोबरचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. देओल कुटुंबासाठी त्यांची माणसं अत्यंत महत्त्वाची आहेत. 

10/10
धर्मेंद्रचा वारसा त्याच्या मुलांसह आणि नातवंडांच्या रूपात अस्तित्वात आहे.  धर्मेंद्र यांचं दोन पत्नी, सहा मुलं, दोन सूना, एका नातसून असं मोठं कुटुंब आबे. प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांच्या आयुष्यात पडद्यामागे राहून त्यांची प्रतिष्ठा जपली. त्यांच्या कुटुंबाचा वारसा जपला. 

Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement