Amit Thackeray: लेकावर पहिला गुन्हा दाखल,राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रया समोर, नेमकं काय म्हणाले?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल तर भविष्यातही असे हजारो गुन्हे मी अभिमानाने करेल, असे अमित ठाकरे म्हणाले.
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच परवानगीशिवाय अनावरण तसेच त्या ठिकाणी मोठी गर्दी जमवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे त्यानंतर आज अमित ठाकरेंनी स्वत:माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली आहे.
अमित ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माझ्यावर गुन्हा दाखल याचा मला अभिमान आहे. महाराजांचा पुतळा घाणेरड्या कपड्यात गुंडाळून ठेवला होता, त्याच्यावर प्रचंड धूळ बसली होती. मी कोणत्याही राजकीय स्वार्थापोटी नाही तर फक्त महाराजांसाठी आणि जनतेसाठी त्याचे अनावरण केले आहे. महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल तर भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेल.
advertisement
आदित्य ठाकरेंच्या पोस्टवर अमित ठाकरे काय म्हणाले?
अमित ठाकरे यांच्यासाठी चुलत बंधू आणि आमदार आदित्य ठाकरे देखील धावून आले आहेत. आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यावर अमित ठाकरे म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे धन्यवाद.. की पोस्ट टाकली.. मी त्यांना भेटायला जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान तिकडे विमानतळाचं उद्घाटन करायला जातात पण त्यांना महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करायला वेळ नाही. आता परत तो बंद करून ठेवलाय आहे.. आता आम्ही परत जाऊन जनतेसाठी खुला करणार असून पुन्हा तो झाकलेला कपडा काढणार आहे. महाराजांचा पुतळा चार महिने धूळ खात कपड्याने झाकला होता, हा अपमान आहे.
advertisement
राज ठाकरेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली?
गुन्हा दाखल झाल्यावर राज ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली यावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले,मी राज साहेबांच्या घरात वाढलो आहे. गुन्हा दाखल झाल्यावर पुढील न्यायलयीन प्रक्रिया काय असते याविषयी मला माहिती आहे. राज ठाकरेंना ज्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल झाला याची माहिती मिळाली तेव्हा ते फक्त हसले...
advertisement
महाराजांचा अपमान मी सहन करणार नाही : अमित ठाकरे
पोलिसांनी गुन्हा दाख केला त्यावर अमित ठाकरे म्हणाले, पोलिस त्यांचे काम करत होते, त्यांना काही बोलणार नाही. आम्ही पुतळ्याचे अनावरण केल्यावर आम्हाला कुठेच काम बाकी आहे हे दिसले नाही. काम बाकी आहे मग चार महिने झाकून का ठेवला? त्याचा अपमान किमान मी तरी नाही सहन करू शकत नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 5:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amit Thackeray: लेकावर पहिला गुन्हा दाखल,राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रया समोर, नेमकं काय म्हणाले?


