आधी अत्याचार, मग दगडाने ठेचलं, वाशिममध्ये नराधमाचे महिलेसोबत राक्षसी कृत्य
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मृतदेहाचे डोके दगडाने ठेचलेले असून अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
वाशिम : वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी वाशिम पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने पोलिस चौकशीत महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मात्र या प्रकरणातील अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात काल दुपारी सुमारे 45 ते 50 वयोगटातील एका अज्ञात महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे डोके दगडाने ठेचलेले असून अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना उघडकीस येताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास
advertisement
घटनास्थळी तपास करत असताना पोलिसांना दारूच्या बाटल्या, पॅन्टचा बेल्ट तसेच खाण्याचे साहित्य आढळून आले. या पुराव्यांवरून संबंधित महिलेवर आधी लैंगिक अत्याचार करण्यात आला असावा आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
advertisement
दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली
सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार येथील रहिवासी संतोष रामराव खंडारे याला अकोला रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपीने सदर महिलेवर बलात्कार करून नंतर दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीविरोधात कठोर कलमान्वये गुन्हा दाखल
advertisement
दरम्यान, या प्रकरणातील मृत महिलेचे शवविच्छेदन प्रक्रिया सुरू असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच बलात्कार आणि हत्येबाबतची अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून आरोपीविरोधात कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Washim,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 3:24 PM IST











