कुरकुरीत- खुसखुशीत भजी आणि कोत्तल खाण्यासाठी इथे होते खवय्यांची गर्दी, एकदा चव चाखाच
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
कल्याण मधील मोहने परिसरात सदानंद पुजारी गेल्या 30 वर्षांपासून वडापावचा व्यवसाय करत असले तरी त्यांच्या वडापावाच्या मागणीपेक्षा कोत्तल आणि मूग भजीला प्रचंड मागणी असल्याने संध्याकाळ झाली की लोकांची गर्दी त्यांच्या स्टॉलवर पाहायला मिळते.
कल्याण मधील मोहने परिसरात सदानंद पुजारी गेल्या 30 वर्षांपासून वडापावचा व्यवसाय करत असले तरी त्यांच्या वडापावाच्या मागणीपेक्षा कोत्तल आणि मूग भजीला प्रचंड मागणी असल्याने संध्याकाळ झाली की लोकांची गर्दी त्यांच्या स्टॉलवर पाहायला मिळते. कोत्तल वडा हा वडापावच्या प्रकारांपैकी एक असला तरी त्यांच्या इथे कोत्तल आणि मुगभजी खाण्यासाठी अनेकांची गर्दी असते.
वडापावमध्ये मुख्यत्वे बटाट्याच्या वड्यासोबत चटण्या आणि हिरवी मिरची असते, तर 'कोत्तल वडा' हा वडासोबत त्यांची सजावट आणि साईटला मुगभजी म्हणजे मूगडाळ वापरून बनवलेले कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी असतात. यासाठी भिजवलेली मूगडाळ वाटून, त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि इतर मसाले मिसळून मिश्रण बनवतात. हे मिश्रण गरम तेलात तळून कुरकुरीत भजी तयार केले जातात.
advertisement
कोत्तल वड्याला विशेष मसालेदार तडका दिला जातो, त्यामुळे त्याची चव आणि लोकांची आवड पाहता मोहन्यामधील हे ठिकाण खूप फेमस आहे. वडापाव हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध स्ट्रीट फूड जरी असला तरी त्या वडापावचे अनेक प्रकार वेगवेगळ्या पदार्थात बनवण्याचा प्रयत्न लोक करत असले की वडापाव प्रेमी हमखास त्या कडे वळतात. त्याच वडापाव मधला एक पदार्थ म्हणजे कोत्तल होय. ज्यामध्ये पावासोबत बेसनचा लेअर दिला जातो आणि मध्ये वड्याला लागणारी चटणी भरली जाते. अशा स्वरूपात कोत्तल प्रेमींना खाण्यासाठी दिला जातो कोत्तल वडा हा वडापावचा एक प्रकार आहे, जो लोकांना खूप आवडतो. कारण यामध्ये वड्याला खास तडका दिला जातो. त्यामुळे सदानंद पुजारी यांचा स्टॉल नेहमी कोत्तल वडा आणि मूग भजी खाण्यासाठी रोज अनेकांची गर्दीत भरलेला असतो.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 22, 2025 3:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुरकुरीत- खुसखुशीत भजी आणि कोत्तल खाण्यासाठी इथे होते खवय्यांची गर्दी, एकदा चव चाखाच