'बटेंगे तो कटेंगे'ला भाजपच्याच मुख्यमंत्र्याचा विरोध, पक्षाला दिला घरचा आहेर, काय म्हणाले?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बटेंगे तो कटेंगे'च्या घोषणेनंतर आता महायुतीत दोन गट पडले आहेत. एका गटाकडून या घोषणेचे समर्थन केले जात आहे. तर एका गटाकडून या घोषणेला क़डा़डून विरोध होतोय
मुंबई : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या प्रचार सभेत 'बटेंगे तो कटेंगे'ची घोषणा केली होती. त्यानंतर योगींच्या या घोषणेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे, राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना या घोषणेचा अर्थही समजावून सांगितला होता. मात्र तरी देखील अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यात आता भाजपच्याच एका मुख्यमंत्र्याने या घोषणेला विरोध केला आहे.
'बटेंगे तो कटेंगे'च्या घोषणेनंतर आता महायुतीत दोन गट पडले आहेत. एका गटाकडून या घोषणेचे समर्थन केले जात आहे. तर एका गटाकडून या घोषणेला क़डा़डून विरोध होतोय. विशेष म्हणजे आता भारतीय जनता पक्षाचे नेते योगी आदित्य नाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या विधानाच आता खुद्द भाजपचे नेतेच असमर्थन करताना दिसत आहेत. आता भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 'बटेंगे तो कटेंगे'च्या या घोषणेला विरोध केला आहे.
advertisement
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानाच असमर्थन करत आम्ही सबका साथ विकास, सबका विश्वास ठेवतो, त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, अशे म्हणत प्रमोद सावंत यांनी विरोध दर्शवला. तसेच सरकारने केलेल्या विकासाच्या जोरावर त्यांना मतं मिळणार असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
advertisement
कुठल्याही भाजपच्या नेत्याने किंवा प्रवक्त्याने हे विधान केलेले नाही. हा थर्ड पार्टीने पुढे आणलेला हा विषय आहे. मी ऑन रेकॉर्ड सांगतोय. हे विधान चुकीचे आहे. पक्षाने याला कुठल्याही प्रकारचे समर्थन दिलेले नाही. आणि ज्यांनी कुणी याला समर्थन दिले आहे. त्यांचे समर्थन मी बिल्कुल करणार नाही, हे माझं वैयक्तित मतं आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.
advertisement
पंकजा मुंडे यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझं राजकारण वेगळ आहे. मी भाजपची आहे, म्हणून मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही,तसेच आपण विकासावर काम केलं पाहिजे असं माझं मत आहे.प्रत्येक माणसाला आपलंस करणं हे नेत्याचं काम असतं.त्यामुळे असा कुठलाही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही,असे म्हणत पंकजा मुंडे बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध दर्शवला होता.
advertisement
अजित पवार काय म्हणाले होते?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर तीव्र आक्षेप नोंदवत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेचा दाखला देऊन इतर राज्यांशी तुलना करण्याचे संबंधित नेत्यांनी टाळावे, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता त्यांना सुनावले आहे.
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा मानणारा आहे. कृपा करून महाराष्ट्र आणि इतर राज्याची आपसात तुलना करू नका. इथल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांनी सातत्याने इथे जातीय सलोखा ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी योगींना सुनावले आहे.
advertisement
देवेंद्र फडणवीसांनी समजावून सांगितला अर्थ
हे लोक जनतेचे सेंटींमेट समजू शकले नाही. या घोषणेचा अर्थ समजू शकले नाही. आणि बोलताना त्यांना वेगळे सांगायचे आहे आणि ते वेगळे सांगून गेले आहेत. अजित पवारांच सांगायचं झालं तर आतापर्यंत हिंदू विरोधी असलेल्या विचारात राहिले आहेत. त्यांची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या हिंदू विरोधला म्हणजे धर्मनिरपेक्षता होती. त्यांना जनतेचा कल समजून घेण्यास थोडासा वेळ लागणार आहे. बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा अर्थ समाजाला एकत्र ठेवणे आहे.त्यात काही चुकीचे नाही, असे आपणास वाटते,अशा शब्दात फडणवीसांनी अजित पवारांना अर्थ समजावून सांगितला.
advertisement
फडणवीसांनी अर्थ समजावून सांगून देखील अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. बटेंगे तो कंटेगा या नाऱ्याला तर माझा विरोध आहे. या घोषणेला भाजपमधून देखील विरोध झाला आहे. प्रत्येक राज्याचे राजकारण हे वेगवेगळ असते. उत्तरप्रदेशमध्ये हे चालत असेल पण महाराष्ट्रात हे चालणार नाही. मी ऐकलं की पंकजा मुंडेंनी देखील विरोध केला आहे, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे आता बटेंगे तो कंटेगे या नाऱ्यावरून दोन गट पडले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2024 3:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'बटेंगे तो कटेंगे'ला भाजपच्याच मुख्यमंत्र्याचा विरोध, पक्षाला दिला घरचा आहेर, काय म्हणाले?


