Gondia News : प्रेम विवाह करायचा असेल तर घरच्यांची परवानगी घ्या नाहीतर..; गोदिंयातील ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आजच्या युगात प्रेम विवाहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मात्र अशा विवाहांसाठी गोंदियातील एका गावात कुटुंबाची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.
गोंदिया, 16 सप्टेंबर, रवी सपाटे : आजच्या युगात प्रेम विवाहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अनेक तरुण, तरुणी आपला जोडीदार स्वत:च निवडतात. त्याच्यासोबतच विवाह करतात. यातील काही प्रेम विवाह हे यशस्वी देखील होतात. मात्र काही प्रकरणात प्रेम विवाहाला घरून विरोध असतो. त्याला अनेक कारणे असतात. यातून पुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे असे प्रश्न आणि त्यातून होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीनं एक अनोखा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार जर गावातील एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला प्रेम विवाह करायचा असेल तर त्यांना घरच्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. कुटुंबाची परवानगी असेल तरच अशा दाम्पत्याला लग्नाचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसा ठरावच ग्रामपंचायतीनं संमत केला आहे. त्यामुळे आता या गावात जर कोणाला प्रेम विवाह करायचा असेल तर त्याला सर्वाप्रथम त्यांच्या कुटुंबाची परवानगी घ्यावी लागणार आहे. कुटुंबाची परवानगी असेल तरच त्याला लग्नाचं प्रमाणपत्र मिळणार आहे.
advertisement
या अनोख्या निर्णयामुळे ही ग्रामपंचायत चांगलीच चर्चेत आली आहे. एकीकडे आंतरजातीय लग्नांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र दुसरीकडे नानव्हा ग्रामपंचायतीनं असा निर्णय घेतल्यानं हे गाव सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.
Location :
Gondiya,Gondiya,Maharashtra
First Published :
September 16, 2023 10:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia News : प्रेम विवाह करायचा असेल तर घरच्यांची परवानगी घ्या नाहीतर..; गोदिंयातील ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव


