Investment: विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, 81 हजार कोटींचे 2 मोठे प्रकल्प येणार!
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
मोठ्या प्रतिक्षेनंतर आता राज्यात मोठी गुंतवणूक येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, 81 हजार कोटींचे 2 मोठे प्रकल्प येणार....
नागपूर: राज्यातील उद्योगधंदे, परकीय गुंतवणूक परराज्यात गेल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. पण आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मोठं गिफ्ट मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी रोजगाराच्या दृष्टीने मोठी आनंदाची बातमी आहे. कारण या प्रदेशात आता मोठी गुंतवणूक येणार आहे.
विदर्भ-मराठवाड्याला दिलासा:
विदर्भ आणि मराठवाड्यात 75 हजार कोटींची गुंतवणूक मिळणार आहे. ज्यामुळे 19 हजार जणांना रोजगार मिळणार आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्रात जवळपास 81 हजार कोटींची गुंतवणूक आणण्यात राज्याला यश आलं आहे.ग्रीन एनर्जी, ग्रीन मोबिलिटी आणि सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक या निमित्ताने येत आहे.
मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मोठे निर्णय:
अवाडा इलेक्ट्रो लिमिटेड 13 हजार कोटींची गुंतवणूक नागपुरात तर पनवेलमध्ये 650 कोटींची गुंतवणूक करणार आहे. ज्यामुळे 8 हजार जणांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. ही बाब बेरोजरागीने त्रस्त असणाऱ्या तरूणांसाठी निश्चितच दिलासादायक आहे. तर अवाडा इलेक्ट्रो कंपनी ही सोलर पीव्ही मोड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझर निर्मितीचे काम करते. जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीकडून 25 हजार कोटींची नागपुरात गुंतवणूक करण्यात येत आहे. ही कंपनी जगविख्यात आहे. 5 हजार जणांना कायमचा रोजगार यामुळे मिळणार आहे.लिथियम बॅटरी निर्मितीत जेएसडब्ल्यूकडून गुंतवणूक करण्यात येत आहे.
advertisement
दुसरीकडे सर्वात महत्वाची बाब म्हणजे संभाजीनगरमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटीकडून 27 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. संभाजीनगरमध्ये 5 हजार 200 जणांना कायमाचा रोजगार या उद्योगामुळे मिळेल, असा दावा केला जात आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीत जेएसडब्ल्यू कंपनीचे पाऊल यानिमित्ताने पडते आहे. पर्नोड रिकार्ड कंपनीकडून देखील जवळपास 1875 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. यामुळे 800 जणांना रोजगार मिळणार आहे. एकंदरीतच ऐन विधासभेच्या तोंडावर राज्यात मोठी गुंतवणूक येणार अशी घोषणा करण्यात आली आहे, विरोधी गटाकडून राज्यसरकारला सातत्याने या संदर्भात प्रश्न विचारले जात होते, टीका होत होती. कुठेतरी थोडा का होईना, या गुंतवणूकीमुळे दिलासा मिळणार आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
July 30, 2024 8:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Investment: विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, 81 हजार कोटींचे 2 मोठे प्रकल्प येणार!