धर्मांतरासाठी येणाऱ्यांचा सैराट करा, ११ लाख बक्षीस, पोलिसांचे मी बघून घेईन, पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य

Last Updated:

Gopichand Padalkar: सांगलीतील ऋतुजा राजगे या गर्भवती तरुणीने धर्मांतरासाठी सासरचे लोक छळ करीत असल्याने आत्महत्या केली. तिच्या न्यायासाठीच्या मोर्चाला संबोधित करताना गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

गोपीचंद पडळकर (भाजप आमदार)
गोपीचंद पडळकर (भाजप आमदार)
सांगली : माझा जीव गेला तरी धर्म बदलणार नाही असे संभाजी महाराजांनी औरंजेबाला सांगितले. संभाजी महाराज यांचे हाल हाल होऊन त्यांचे प्राण गेले पण त्यांनी धर्म बदलला नाही. अश्या धर्मवीर संभाजी महाराजांची विचारांची कन्या ऋतुजा राजगे आहे. तिनेही धर्मासाठी बलिदान दिले. परंतु आपल्या लेकींनी अशी टोकाची पावले उचलायला नको यासाठी आता आपण धर्मांतर घडवून आणण्यासाठी येणाऱ्यांना ठोकून काढण्याची मोहीम सुरू करू, असे सांगत धर्मांतरासाठी येणाऱ्यांचा जो व्यक्ती सैराट करेल (मारून टाकेल) त्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले. पोलिसांची काळजी तुम्ही करू नका, पोलिसांचे मी बघतो, असेही पडळकर म्हणाले.
सांगलीतील ऋतुजा राजगे या गर्भवती तरुणीने धर्मांतरासाठी सासरचे लोक छळ करीत असल्याने आत्महत्या केली. तिला न्याय मिळवून देण्यासाठी सांगलीत विराट मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना गोपीचंद पडळकर यांनी अतिशय आक्रमक आवेशात भाषण केले.

'लव्ह जिहाद'वाले हिरवे साप, ख्रिश्चन धर्मांतर करणारे अजगर

हिंदू धर्म कोणावर अन्याय करणार नाही. ऋतुजा ही उच्च शिक्षित मुलगी होती. ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. कोळी नामक नायब तहसीलदाराने ऋतुजाचे लग्न लावले तो आजही शासकीय सेवेत आहेत. पण सात महिन्यांची गर्भवती असताना छळापायी तिला जीवन संपवावे लागले. यापुढे धर्मांतर करण्यासाठी जो व्यक्ती गावात घरात येईल आणि बळजबरी करेल त्याला बदडून काढा. लव्ह जिहाद करणारे जसे हिरवे साप आहेत तसे ख्रिश्चन धर्मांतर करणारे अजगर आहेत. अशा अजगरांवर जेसीबी फिरवण्याचे काम केले पाहिजे, असे पडळकर म्हणाले.
advertisement

धर्मांतरासाठी येणाऱ्यांचे खांडोळे करा, पोलिसांचे मी बघून घेईन

धर्मांतर करणाऱ्यांच्या औलादीच्या कानावर माझा आवाज जात असेल तर त्यांनी ऐकावे. राजकारण आमच्यासाठी महत्त्वाचा विषय नाही, हिंदू धर्म टिकला पाहिजे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अन्यथा येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही. धर्मांतरासाठी येणाऱ्यांचे खांडोळे करा, पोलिसांचे मी बघून घेईन. हिंदू धर्मावर अनेक आक्रमण झाली, पण हिंदू संपला नाही.
advertisement

'त्याचा' सैराट करणाऱ्याला अकरा लाख बक्षीस

धर्मांतर करण्यासाठी गावात कोणी आलं तर त्याला ठोकून कोण काढा. गावागावात जसे बैलगाडी शर्यतीला बक्षीस असते, तशा पध्दतीने गावागावात धर्मांतरणासाठी येणाऱ्या ठोकून काढणाऱ्यांसाठी बक्षीस जाहीर केले पाहिजे. ठोकून काढल्यास पाच लाख रुपये आणि त्याचा सैराट करणाऱ्यास 11 लाख बक्षीस द्यायला पाहिजे. पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला तयार आहे पण त्याला आता सुट्टी नाही, ऋतुजाचा जीव गेलाय, असे पडळकर म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धर्मांतरासाठी येणाऱ्यांचा सैराट करा, ११ लाख बक्षीस, पोलिसांचे मी बघून घेईन, पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement