advertisement

वाल्मीकपेक्षा खूंखार! 5 हाफ मर्डर, 33 दरोडे, गोट्या गित्तेचा काळा इतिहास अंडरवर्ल्डला लाजवणारा

Last Updated:

Gotya Gitte Criminal History: महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित गोट्या गितेचा गुन्हेगारी इतिहास वाल्मीक कराडपेक्षा भयंकर असल्याचं समोर आलं आहे. गोट्या गितेवर तब्बल ४३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या उर्फ ज्ञानोबा गिते मागील अनेक दिवसांपासून फरार आहे. त्याच्यावर बीड पोलिसांनी मोक्का लावला आहे. मात्र त्याचा अद्याप थांगपत्ता लागत नाही. अशात आता गोट्या गितेनं अलीकडेच रेल्वे रुळावर बसून एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तो शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांसह खासदार बजरंग सोनवणे, सुरेश धस यांना धमकावताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता गोट्या गितेचे विविध कांड समोर येत आहेत. त्यांच्या गुन्हेगारीचे आणि दहशतीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
यातून गोट्या गितेचा गुन्हेगारी इतिहास समोर येत आहे. गोट्या गिते हा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचा खास मानला जातो. मात्र त्याचा गुन्हेगारी इतिहास हा वाल्मीक कराडपेक्षा भयंकर असल्याचं समोर आलं आहे. गोट्या गितेवर तब्बल ४३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात हाफ मर्डरसह दरोडे, चोरी खंडणीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
advertisement

गोट्या गितेचा गुन्हेगारी इतिहास

दोन टोपण नावे आणि गुन्हेगारीचा काळा इतिहास असलेल्या गोट्या गित्तेवर हाफ मर्डर, दरोड्यासारखे तब्बल ४३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने बीड जिल्ह्यात परळी, अंबाजोगाई तालुक्यात दहशत निर्माण करण्यासह इतर पाच जिल्ह्यात जावून गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. यात दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, अपहरण, खंडणी अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
advertisement
बीडच्या परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असणारा गोट्या ऊर्फ ज्ञानोबा ऊर्फ ग्यानबा मारुती गित्ते कुख्यात दरोडेखोर आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संशयित आरोपी म्हणून त्याचं नाव घेतलं आहे. यानंतर गोट्या गीते चर्चेत आला. परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणावेळी गोट्या हजर होता. बीड पोलिसांनी त्याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई केली. यातही तो फरार आहे.
advertisement

गोट्यावर कोण कोणते गुन्हे दाखल

- दरोडा/दरोड्याचा प्रयत्न - ७
- दरोडा आणि खुनाचा प्रयत्न - १
- जबरी चोरी/चोरी - २५
- खुनाचा प्रयत्न - ५
- अपहरण - १
- खंडणी - २
- शासकीय अधिकाऱ्याच्या कामात अडथळा - १
- इतर गुन्हे - १

कोणत्या जिल्ह्यात किती गुन्हे

advertisement
- बीड जिल्हा : २५ गुन्हे
- पुणे जिल्हा : ९ गुन्हे
- लातूर जिल्हा: ३ गुन्हे
- परभणी जिल्हा: २ गुन्हे
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा : १ गुन्हा
- इतर : ३ गुन्हे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाल्मीकपेक्षा खूंखार! 5 हाफ मर्डर, 33 दरोडे, गोट्या गित्तेचा काळा इतिहास अंडरवर्ल्डला लाजवणारा
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement