29 वर्षानंतर गुलशनकुमारांच्या खून्याचा तुरुंगात शेवट, एकदा मृत्यूला चकवलं, पण चौथ्या दिवशी अंत

Last Updated:

टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील मुख्य हल्लेखोर आणि कुख्यात शूटर अब्दुल रऊफ उर्फ दाऊद मर्चंट (६०) याचा मृत्यू झाला आहे.

News18
News18
टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील मुख्य हल्लेखोर आणि कुख्यात शूटर अब्दुल रऊफ उर्फ दाऊद मर्चंट (६०) याचा मृत्यू झाला आहे. ८ जानेवारी रोजी सकाळी हर्सूल मध्यवर्ती कारागृहात त्याची प्राणज्योत मालवली. तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गुलशन कुमार यांच्यावर झाडल्या होत्या १६ गोळ्या

१२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील अंधेरी येथील जीतनगर भागात असलेल्या शिवमंदिरातून बाहेर पडत असताना गुलशन कुमार यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा हस्तक असलेल्या अब्दुल रऊफ मर्चंटने अतिशय जवळून गुलशन कुमार यांच्यावर तब्बल १६ गोळ्या झाडल्या होत्या. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात मर्चंट मुख्य हल्लेखोर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर २००२ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. २००३ मध्ये त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात करण्यात आली होती.
advertisement

पॅरोलवर बाहेर पडला आणि ८ वर्षे फरार झाला

अब्दुल मर्चंट याची २००९ मध्ये पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर पडताच त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले. तब्बल आठ वर्षे तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. अखेर २०१६-१७ मध्ये पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पुन्हा अटक केली आणि त्याची रवानगी पुन्हा हर्सूल कारागृहात करण्यात आली होती.
advertisement

एकदा मृत्यूला चकवलं, पण चौथ्या दिवशी अंत

गेल्या काही दिवसांपासून मर्चंटची प्रकृती खालावली होती. ३० डिसेंबर रोजी त्याला सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर तातडीने त्याला शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याचं पाहून ४ जानेवारी रोजी त्याला पुन्हा कारागृहात हलवण्यात आले. मात्र, गुरुवारी सकाळी त्याला पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
29 वर्षानंतर गुलशनकुमारांच्या खून्याचा तुरुंगात शेवट, एकदा मृत्यूला चकवलं, पण चौथ्या दिवशी अंत
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement