Hingoli : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोघे ठार; कारचा चक्काचूर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मनीष खरात, हिंगोली : हिंगोलीत भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. नरसी मार्गावर झालेल्या या अपघातात दोघे जागीच ठार झाले असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरहून उमरखेडच्या दिशेने जात असताना कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिरुद्ध तानाजी वानखेडे आणि अर्चना सुभाष वानखेडे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील खरूज येथील वानखेडे कुटुंबिय छत्रपती संभाजी नगरहून दवाखान्यातून परत येत होते. येताना त्यांच्या कारला हि दुर्घटना घडली आहे.
advertisement
अपघातातील जखमी झालेल्यांची नावे सुभाष रामराव वानखेडे, संतोष कैलास वानखेडे, अनंता गंगाराम चव्हाण अशी आहेत. त्यांच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. कार रस्त्याच्या कडेला खाली घसरली आहे. भरधाव वेगात झाडाला धडकल्याने कारचं मोठं नुकसान झालं आहे. कारचा चुराडा झाला असून घटनास्थळी रक्तस्राव झाल्याचंही दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 04, 2024 1:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोघे ठार; कारचा चक्काचूर