Hingoli Lok Sabha : हिंगोलीत महायुतीची डोकेदुखी वाढली; उमेदवारी बदलूनही बंडखोरी कायम? शिंदेंसमोर मोठं आव्हान

Last Updated:

Hingoli Lok Sabha : हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाल्याने शिवसेना शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंगोली, (मनीष खरात, प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीआधी महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडोबांचे आव्हान असणार आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघ यंदा महायुतीच्या धुसफुशीमुळे चांगला चर्चेत राहिला. भाजपकडून हेमंत पाटील यांच्या जाहीर झालेल्या उमेदवारीला प्रचंड विरोध झाल्यामुळे शिवसेनेने ऐनवेळी बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली. परंतु, तरीही महायुतीत बंडखोरी करत भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या शिवाजीराव जाधव यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम यांची डोकेदुखी वाढली आहे.
हिंगोलीत महायुतीची डोकेदुखी वाढवली
महायुतीत शिवसेनेने बाबुराव कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी रामदास पाटील, श्याम भारती महाराज व माजी जिल्हाध्यक्ष सुप्रीम कोर्टात वकिली करणारे शिवाजीराव जाधव या तिघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या तिघांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपकडून सांगण्यात आलं भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन, मंत्री भागवत कराड त्याचबरोबर आमदार श्रीकांत भारतीय यांनी हिंगोलीत श्याम भारती महाराज व रामदास पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे देखील घेतले. परंतु माजी जिल्हाध्यक्ष राहिलेल्या शिवाजीराव जाधव यांनी मात्र पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत महायुतीमध्ये बंडखोरी केली आहे.
advertisement
2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील जाधव यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यंदा मात्र उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये चांगली धुसफूस वाढली होती. त्यानंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबुराव कदम यांना उमेदवारी दिल्यानंतर ही दुसरी काहीशी कमी होईल असं वाटलं मात्र शिवाजीराव जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे हिंगोलीत महायुतीतला किडा वाढतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
शिवाजीराव जाधव अपक्ष उमेदवार
पक्षाच्या वरिष्ठांनी माझी माझ्याशी संपर्क केला. परंतु, मी उमेदवारी मागे घेणार नाही. आम्ही रात्रंदिवस पक्ष वाढवायचा आणि पक्षाची युती झाल्यानंतर दुसऱ्याचा प्रचार केला आहे. आता मी माघार घेणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यानंतर मी समाज सेवा करेन. परंतु, आता मी माघार घेणार नाही, अशी भूमिका जाधव यांनी घेतली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli Lok Sabha : हिंगोलीत महायुतीची डोकेदुखी वाढली; उमेदवारी बदलूनही बंडखोरी कायम? शिंदेंसमोर मोठं आव्हान
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement