शनीशिंगणापूर रस्त्यावर भीषण अपघात, ट्रॅव्हलरने रिक्षाला उडवले; 5 जणांचा जागेवर मृत्यू
- Reported by:Harish Dimote
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ट्रॅव्हलरची धडक इतकी जोरदार होती की रिक्षा अक्षरशः उडाली. रिक्षामध्ये बसलेले पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला आहे.
अहिल्यानगर : राहुरी–शनीशिंगणापूर मार्गावर रोडवर अत्यंत भीषण अपघात घडला. उंबरे (ता. राहुरी) गावाच्या हद्दीत तांबे पेट्रोलपंपाजवळ भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर आणि रिक्षाची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत रिक्षातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, अनेक
जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हलरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनीशिंगणापूरकडे जाणारा भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर राहुरीकडून येणाऱ्या रिक्षावर आदळला. धडक इतकी जोरदार होती की रिक्षा अक्षरशः उडाली. रिक्षामध्ये बसलेले पाच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अधिकृत आकडेवारी आणि ओळख पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
advertisement
अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू
या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवासीही जखमी झाले असून, काहींना गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने राहुरी व अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ शनीशिंगणापूर रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
शनीशिंगणापूर रोडवरील वाढती अपघातांची संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय
दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनीशिंगणापूर रोडवरील वाढती अपघातांची संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरली असून, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
हे ही वाचा :
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 5:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शनीशिंगणापूर रस्त्यावर भीषण अपघात, ट्रॅव्हलरने रिक्षाला उडवले; 5 जणांचा जागेवर मृत्यू











