चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, आधी गळा दाबला मग मुलीला फोन केला, सिंधुदुर्ग हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पतीनं चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नीची हत्या केली आहे.
सिंधुदुर्ग, प्रसाद पाताडे, प्रतिनिधी : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. कुडाळ तालुक्यातील भडगाव येथे पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली असून याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान पत्नीचा खून करून पती फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हा खून गळा आवळून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
भडगाव येथे बाहेर गावावरून कामानिमित्त आलेल्या ओमप्रकाश बादल सिंग (संशयित आरोपी) याने आपल्या पत्नीचा रेणुका ओमप्रकाश सिंग हिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मात्र पती खून करून पळाला आहे तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. यासंदर्भात कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, आवळेगाव दूरक्षेत्राचे मंगेश जाधव इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
advertisement
कामानिमित्त हे दांपत्य मागील सात महिन्यापासून भाड्याने राहत होते. याबाबत स्वतः संशयित आरोपी ओम प्रकाश बादल सिंग याने कुडाळ येथे राहत असलेल्या आपल्या मुलीला फोन करून मी माझ्या पत्नीचा खून केला आहे असे सांगितले. यानंतर मुलीने भडगाव येथे घटनास्थळी जाऊन पाहिले असता आपली आई मृतावस्थेत आढळल्याने तिने आरडाओरड केली असता स्थानिकांनी या ठिकाणी पाहणी करत सदरील घटना पोलिसांना कळवली व घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करत आहेत.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
October 15, 2024 11:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, आधी गळा दाबला मग मुलीला फोन केला, सिंधुदुर्ग हादरलं