Jalgaon Loksabha Result 2024: जळगावमध्ये भाजप गड कायम राखणार की ठाकरेंची मशाल पेटणार?

Last Updated:

या मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली.

स्मिता वाघ आणि करण पवार
स्मिता वाघ आणि करण पवार
जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी या मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या महायुतीच्या उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मागील 20 वर्षांपासून जळगावात भाजपचाच खासदार आहे. आता यंदाचं या लोकसभा मतदारसंघातील चित्र काही तासात समोर येणार आहे.
खासदार उन्मेष पाटील यांचं बंड -
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करताच भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी बंड पुकारलं. उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनतर उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून बाहेर पडलेले करण पवार यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली. उन्मेष पाटील यांनी करण पवार यांना पाठींबा दिला. त्यामुळे जळगावात भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. यामुळे इथे यंदा भाजपचं कमळ फुलणार की शिवसेनेची मशाल पेटणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
मतदानाचा टक्का वाढला -
जळगाव लोकसभेसाठी यंदा एकूण 57.70 टक्के मतदान झालं. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 56.11 टक्के इतकी होती. यंदाच्या निवडणुकीत वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाला फायदेशीर ठरला, हे आता समोर आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Loksabha Result 2024: जळगावमध्ये भाजप गड कायम राखणार की ठाकरेंची मशाल पेटणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement