राजमल लखीचंद ज्वेलर्सची तपश्चर्या अशी...; ईडीच्या कारवाईवर मालक ईश्वर जैन यांची प्रतिक्रिया
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
ईडीच्या कारवाईने १६८ वर्षांची तपश्चर्या अशी वाया जाणार नाही. ज्वेलर्स उद्योग समूहा हा मित्रांच्या हितचिंतकांच्या मदतीने पुन्हा नव्या जोमाने सुरू करणार असल्याचा विश्वास ईश्वर जैन यांनी व्यक्त केला.
जळगाव, 19 ऑगस्ट : राजमल लखीचंद ज्वेलर्स समुहाच्या दुकानात ईडीने छापे टाकले असून ९० लाख रुपये रोख रक्कम आणि सोने जप्त केले आहे. या कारवाईनंतर राजमल लखीचंद ज्वेलर्स समुहाचे मालक ईश्वर जैन यांनी ईडीची कारवाई चुकीची असून आम्ही कायदेशीर लढा देऊ असं म्हटलं. तसंच या कारवाईने १६८ वर्षांची तपश्चर्या अशी वाया जाणार नाही. ज्वेलर्स उद्योग समूहा हा मित्रांच्या हितचिंतकांच्या मदतीने पुन्हा नव्या जोमाने सुरू करणार असल्याचा विश्वास ईश्वर जैन यांनी व्यक्त केला.
गेल्या दोन दिवसांपासून राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहावर येडीची कारवाई सुरू होती आज पहाटे ही कारवाई संपली. या कारवाईनंतर ईश्वरलाल जैन यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहावर इडी ने छापेमारी करत कारवाई केली. राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाच जळगाव शहरातील मुख्य जे शोरूम आहे त्या ठिकाणाहून 87 लाखांची रोकड आणि त्याठिकाणी विक्रीसाठी असलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले आहे. ईडीची ही कारवाई चुकीची आहे मात्र त्याबाबत कायदेशीर पद्धतीने लढा दिला जाईल असे यावेळी ईश्वरलाल बाबूजी जैन यांनी स्पष्ट केलं.
advertisement
ईश्वरलाल जैन व त्यांच्या पत्नी तसेच मनीष जैन व त्यांच्या पत्नी अशा चार जणांना ईडीच्यावतीने समन्स बजावण्यात आले आहे. आम्ही काही चुकीचे केलेले नाही त्यामुळे आम्ही समन्स बजावल्यानुसार चौकशीसाठी जाणार आहोत. राजकीय दबावतून ही कारवाई झाली असं मला वाटत नाही कारण तसा कुठलाही पुरावा नाही त्यामुळे विना पुरावा असं बोलणं उचित होणार नाही असंही ईश्वरलाल जैन यांनी म्हटलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 19, 2023 1:40 PM IST
मराठी बातम्या/जळगाव/
राजमल लखीचंद ज्वेलर्सची तपश्चर्या अशी...; ईडीच्या कारवाईवर मालक ईश्वर जैन यांची प्रतिक्रिया










