साऊथ मूव्हीपेक्षा कमी नाही जालन्यातला हा घोटाळा, 900 लोकांना गंडा, पोलीसही चक्रावले
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
जालना तालुक्यातील सिधी काळेगाव आणि हडप सावरगाव येथे बनावट एन ए दाखवून सर्रास प्लॉट विक्रीतून फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : साऊथच्या अनेक मूव्हीमध्ये आपण जमिनीच्या फसवणुकीचे घोटाळे बघितले असतील. असाच काहीसा प्रकार जालन्यात घडला आहे. जालना तालुक्यातील सिधी काळेगाव आणि हडप सावरगाव येथे बनावट एन ए दाखवून सर्रास प्लॉट विक्रीतून तब्बल 900 जणांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली आहे. यामुळे पोलीसही चक्रावले. त्यानंतर फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याबाबत पोलीस प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून याप्रकरणात अनियमित ठेव योजना बंदी अधिनियमान्वये दखल घेण्यात आली आहे.
advertisement
जालना तालुक्यातील सिंधी काळेगांव येथील गट क्र. 166 आणि मौजे सावरगांव हडप गट क्र. 84 आणि 85 मधील शेताचा शासनाचा अकृषक परवाना न घेता बनावट अकृषक परवाना बनवून प्लॉट बनवले. लोकांना नमुदचा अकृषक परवाना खरा असल्याचे भासवले, तसेच नमुद प्लॉटची हप्त्यावारी पैसे गोळ्या करण्याबाबत कुठलीही परवानगी न घेता लोकांकडून हप्त्यावारी पैसे घेऊन बनावट अकृषक परवान्या आधारे प्लॉट विक्री केल्याबाबतची फिर्याद जालना तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार देविदास माधवराव खटावकर यांनी पोलीस स्टेशन तालुका जालना आणि मौजपुरी येथे नोंदविली होती.
advertisement
दिनांक 17/12/2024 आणि दिनांक 10/12/2024 रोजी शेख मुस्ताक शेख अमीर आणि शेख असिफ शेख अमीर दोन्ही रा. कुचरवट्टा, जुना जालना यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये शेख मुश्ताक आणि शेख अमीर यांनी बनावट एन ए करुन आणि मासिक लॉटरी, सोडत पध्दतीची कुठलीही परवानगी नसतांना प्लॉट देण्याचे आमिष दाखवून सर्वसाधारण लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक केलेली असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या अनुषगाने फसवणूक झालेल्या लोकांच्या मागणीवरुन नव्याने अस्तित्वात आलेल्या केंद्र सरकारकाचा नमुद तरतुदीची अमलबजावणी प्रभावीपणे करून गुंतवणुकीदारांची फसवणूक झालेली रक्कम परत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची नियोजीत केले आहे.
advertisement
मौजे सिंधीकाळेगांव गट क्रं. 166 आणि मौजे सावरगांव हडप गट क्रं. 84 आणि 85 मध्ये कोणी प्लॉट विकत घेतलेल्या आणि फसवणूक झालेल्या लोकांनी पैसे भरणा केल्याच्या पावत्या, करारनामा, इसार पावती, विक्रीपत्रक इ. उपलब्ध कागदपत्रासह सिंधीकाळेगांव गट क्रं. 166 अनुषगांने पो. स्टे. तालुका आणि सावरगांव हडप गट क्रं. 84 आणि 85 चे अनुषगांने पो. स्टे. मौजपुरी येथे खालील प्रमाणे नमुद तपास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी केले आहे.
advertisement
अनियमित ठेव योजना बंदी अधिनियम 2019 या कायद्यामध्ये तरतुद असल्याप्रमाणे कलम 3 आणि त्याचे शिक्षा कलम 21(1) (2) हे नमुद दोन्ही गुन्हामध्ये लागू करण्यात आले असून सदर कायद्यामध्ये गुंतवणुकदारांचे झालेली फसवणूक संबंधाने फसवणूक रक्कम परत करण्याची तरतुद आहे.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Jan 08, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
साऊथ मूव्हीपेक्षा कमी नाही जालन्यातला हा घोटाळा, 900 लोकांना गंडा, पोलीसही चक्रावले









